या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०

आहेत त्याप्रमाणेच हा शीख लोकांचा नानकशाही पंथही उ- त्पन्न झाला आहे. प्रथमतः नानकशहाने धर्माच्या बाबतींत आपल्या बुद्धीस जे योग्य वाटलें तें घेऊन जे त्याज्य वाटले तें टाकिलें आणि अशा प्रकारचा एक धर्मग्रंथ बनविला आणि आपण त्याप्रमाणे लोकांस उपदेश करूं लागला. असे उ पादेष्ट झालेले जे लोक ते शीख होत. आरंभी हा पंथ फारसा बलाढ्य नव्हता तरी मुसलमान लोकांच्या छळणुकीमुळे आणि त्या पंथांतील अग्रसर लोकांच्या महत्वाकांक्षीपणामुळे उत्तरोत्तर त्यास पुष्कळ बळकटी आली. औरंगजेत्र पादश- हाने हिंदु धर्माच्या सर्व पंथांचा उच्छेद करण्याबद्दल होईल तितकी पराकाष्ठा केली ही गोष्ट सर्वांस महशूर आहे.त्या पादशहाच्या वेळीं शीख लोकांचा मुख्य धर्माध्यक्ष गोविंद सिंह म्हणून होता. हा मनुष्य अत्यंत महत्वाकांक्षी होता. ह्याने आपल्या बुद्धि कौशल्याने नानकशहानें केलेली जीं शां- तिपर सूत्रे ती सर्व युद्धपर लावून त्याप्रमाणे लोकांस उपदेश करून सर्व शीख लोक मोठे शिपाई करून टाकिले. आतां आपण वेगवेगळ्या पंथाचा विचार करूं.

उदासी.

 शीख लोकांपैकी जे लोक उदासी पंथास अवलंबून आहेत ते सर्व नानकशाही पंथाचे खरे शिष्य आहेत असे मानण्यास चिंता नाही. हे लोक इहलौकिक अवस्थांतराविषयी फार औदासिन्य दाखवितात. हे लोक फार विरक्त असतात आणि आपला सर्व काळ ईश्वराचें ध्यान आणि भजन करण्यांत घाल- वितात. त्यांचा जो मठ असतो त्याला संगत असे म्हणतात. हे लोक पुष्कळ एकत्र जमून यात्रा करीत फिरतात. हिंदु- स्थानांतील मोठमोठ्या शहरांतून एकाद दुसरा उदासी शीख