या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२

वाची मुक्तता मायेच्या पाशापासून कोणत्या प्रकारे करावी त्यावर आहे. नानक आणि कबीर ह्यांच्या मते सर्व एकच आहेत व धर्म संबंधी कामामध्ये हिंदूनी आणि मुसलमानाती आपणास वेगळे आहोत असे मानावे हे बरोबर नाहीं. ते उभ- यतां हिंदूस व मुसलमानास असा उपदेश करीत कौं, दोन्ही धर्मांच्या मुख्य गोष्टी एकच आहेत. फक्त मध्यंतरी ज्या आगं- तुक चाली मध्ये शिरून परस्परांचे निरर्थक वैपरित्य आले आहे तितके काढून टाकणे अवश्य आहे.

गंजभक्षी.

 ह्या लोकांची माहिती विशेष मिळत नाहीं. फक्त हे नांव त्या पंथाच्या लोकांस त्याच्या मूळ आचार्यावरून पडलें आहे इतकेच कळते.

रामराई.

 रामराय म्हणून हरीरायाचा नातू अगर पणतू होता. त्या- चा आणि हरी कृष्ण हा हारिरामाचा मुलगा होता. त्याच्या बरो- बर मठाधिपत्याविषयीं तंटा झाला. तेव्हां जे शीख लोक राम- रायाच्या पक्षाचे होते ते त्यांचा मोड झाला तरी त्यांच्याकडे तसेच राहिले आणि त्यानें स्थापिलेल्या धर्माचे अनुयाई झाले. रामरायाचा हक्क मठाधिपत्याविषयीं खरा आहे व तो पुण्य पुरुष होता म्हणून त्यानें पुष्कळ अनुभविक कृत्ये केलीं. ह्याबद्दल रामराई लोकांमध्ये मोठे ग्रंथ आहेत. हा पंथ १६६० मध्ये उद्भवला. ह्या पंथाचे लोक हिंदुस्थानांत फारसे नाहींत.