या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४

नरी त्याच्या पंथांत गेला तरी तो घेई. असे त्याने केल्यापा- सून शीख लोकांस राष्ट्रत्व आले असे जरी आहे तरी ते हिंदू- च्या सर्व देवांची भक्ति करितात; त्यांचे सर्व सण पाळितात, त्यांचीच काय ती ह्यांस वाचावयास पुस्तकें, आणि ते ब्राम्हणास मोठा मान देतात. ह्यावरून हे स्पष्ट होते कीं, जरी त्यांनी जाति- भेद मोडला व वेद पुराणे वगैरेवदल दशवादशहाका ग्रंथ वाचूं लागले तरी आपण मुळचे हिंदूच आहोत हे त्यांच्या मनांत पक्के ठसले आहे. दशवादशहाका ग्रंथ गुरुगोविं दानें केला व तो नानकापासून दहावा उपदेशक झाला म्हणून त्या ग्रंथास दशपादशहाका ग्रंथ म्हणू लागले. गुरुगोविंद अ ठराव्या शतकाच्या आरंभी प्रसिद्धीस आला.

निर्मळ.

 ह्या लोकांच्यामध्ये आणि उदासींच्या मध्ये फारसे अंतर नाहीं. वास्तविक पाहिले तर नानकानें जो धर्म सांगितला त्याप्रमाणे हेच लोक यथार्थ आचरण करितात असे म्हटले पाहिजे. त्यांचे नांव निर्मळवधी हे आहे म्हणजे नानकापासून आलेल्या धर्मांत भेसळ न होऊं देतां मुळच्या धर्माप्रमाणे वागणा- रे ते जगांतील दूषणापासून आपण अलग आहोत असे ते सांगतात, व निरंतर धर्म आचरणामध्ये काळ घालवितात. ते लग्न करीत नाहींत व प्रायः अल्प वस्त्रे परिधान करितात. ते उदासी पंथाच्या शीख लोकांप्रमाणे संगतींत जमून राहात नाहीत व ईश्वर भजन करण्याचा त्यांचा एक विवक्षित मार्ग नाहीं. नानक, कबीर वगैरे दुसरे एकेश्वर वादींच्या ग्रंथाचें वाचन मनन करून ते ईश्वराचन करितात. हे लोक आ- पल्या शिष्यांपासून उपजीविका करितात. ते वेदांत शास्त्रांत