या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्रिकोन होण्यापुरतीच हजामत करवितो, कोणी नुसती शेंडी कायम ठेवून सर्व हजामत करवितो, कोणी सर्व डोक्याभर दोन अगर तीन बोटे लांबीचे केंस राखितो, ह्याप्रमाणे नाना तहान स्मश्रु करविणारे लोक एका जातींत आढळतात. बायकांच्या नथेचा मासला कसा असतो ते आपणास थोडक्यांत कळवितो. नाकांत जी नथ घालण्याची ती घातली म्हणजे वेंवीच्या वर दोन बोटे पडते. सारांश काय सांगावयाचा. महाराज आतां माझ्या ध्यानांत आले “अगे अगे बायको ऊठ ऊठ तुझ्या नथेंतून तीर मारूं दे " ह्या म्हणींचे तात्पर्य! कां एडिटर बावा असल्या नथेंतून तोफेचा गोळा ती नाकांत असतां निघून पार जाण्यास कांही अडचण पडेल काय? नाहींहो नाहीं. मग तीर तर सहज निघून जाईल. वः काय तिरंदाजी ही.अस्तु.
 "आम्ही अमरसरास गेलो म्हणून तुम्हाला मागल्या पत्र लिहून कळविलेंच आहे.
 अमरसराहून जे निघालों ते थेट आग्रयास उतरलो. कां एडिटरराव केवढा प्रवास हा. अहो महाराज, हिमालयाच्या पायथ्याशी आम्ही सकाळी थंडीनें कुडकुडत होतो ते एकदम संध्याकाळी दिल्लीच्या पलीकडे उष्ण प्रदेशांत पडलो. काय आमच्या प्रवासाची स्थिति सांगावी. सकाळपासून संध्याका- ळपर्यंत हवेत, देशांत, त्यांच्या भाषेत किती फरक !!! ह्याचे वर्णन करवत नाहीं. सकाळी पंजाबी भाषा, दोन प्रहरीं गुरजरी आणि संध्याकाळी एकदम दिल्ली प्रांतची शुद्ध मुसलमानी.
 आग्रा शहर हे यमुनेचे काठ अंतरवेदी बाहेर आहे. ह्या- पासून ग्वालेर ३६ कोश आहे.आणि मथुरा १८ कोश आहे. आम्ही आग्र्यास पोहोचलो.त्याच्या अदल्या दिवशींच तेथील किल्ल्यांत स्टोअर हौस आहे, त्यांत दारूखान्यांस आग लागून २५,३० मनुष्ये जाया झालीं होतींव तेथील इमारतही बरीच
.