या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०

क्षणी लोकांची वस्ती येथें पुष्कळ आहे. हल्ली ते लोक निरा- श्रित झाले आहेत. त्यांपैकी सर्व ब्राम्हण लोकांच्या कुटुंबांस अलीजा बहादर शिंदे सरकार यांणी कांही साह्य करून दिले आहे. ह्या ठिकाणी सन १८५७ इसवीचे बंड फार भयंकर रांतीचे झाले ही गोष्ट प्रसिद्धच आहे. कानपूर हे शहर फार मोठे आहे. एडिटरराव इकडच्या दगडी इमारतीची तन्हाच कांही चमत्कारिक. सगळी घरें चार मजली पांच मजली महिरापदार न- क्षीचे काम. ह्या सर्व गोष्टींनी एकंदर शहरास जी रमणीय शोभा येते ती अवर्णनीय आहे.
 येथे गंगा तटार्की साहेब लोकांनी मोठे मौजेचे बंगले बांधले आहेत आणि त्यांतून ते वास करून विहार करतात. धन्य आ हेत ते इतकेंच म्हणावयाचें. अहो, मला एक भ्रांती उत्पन्न झाली आहे. ती कोणती ह्मणाल तर साहेब लोकांच्या बंगल्याची तहाही पुष्कळांशी इकडील नेटिव इमारती सारखीच दिसते. तेव्हां ही तन्हा चांगली म्हणावी किंवा कसें. असो त्या पोकळ बोलण्यांत काय हशील आहे. आपले काम पुढे चालवूं या.ह्याच गांवीं जो सत्य श्रीतास कालवा भागीरथीचा काढला आहे तो पुनः भागीरथीस मि ळविला आहे. हा कालवा शहरांतून सुमारे दोन कोस गेला आहे आणि ह्याच्या दुयड्यानी सराया बांधल्या आहेत. त्या फार रमणीय आहेत. ह्या कालव्यांत हरिद्वारास नावेत बसतात ते कानपुरास उतरतात; अशी मोठी मौज केली आहे.
 कानपुरास गंगेच्या पैलतीरी आम्ही एक मुक्काम केला. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठाच्या गाडीस लखनीस जाण्यास नि- घालों तो साडे दहा वाजतां लखनी स्टेशनावर पोहोचलो. हे स्टेशन मध्यम तऱ्हेचें बांधलेले आहे. लखनी स्टेशनापासून गांव सुमारें पक्का दीड कोस आहे. येयें स्टेशनापासून एक मैलावर राजा मानशिंगाने एक धर्मशाळा बांधली आहे.सुमारे २००० उतारूपेक्षा ज्यास्ती लोक राहतील येवढी मोठी आहे, व