या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१

ही धर्मशाळा एका मोठ्या राजवाडयासारखी आहे. लखनौ शहर ही एक अजब चीज आहे. ह्याचे यथार्थ वर्णन करण्यास मी असमर्थ आहे हे मला कबूल करणे भाग आहे. ह्या शहरचे बाजार ही फारच मोठे. तरी एडिटर बाबा हे दहा आणें शहर इंग्रज सर- काराने बंडाच्या साली अगदी उद्वस्त करून टाकिले आहे. येथे फारशी भाषेंत निष्णात असे पुष्कळ लोक मला आढळले. येथे इमाम वाडा आणि केसरी बाग ही दोन स्थले पाहण्यासारखी आ हेत. येथील किल्ला पाडून अगदी जमीनदोस्त केला आहे.
 इमाम वाड्यांत नवाच लोकांच्या कबरी आहेत. ह्या कबरीस पुष्कळ पैसा खर्च झालेला आहे. संगमरवरी दगडाचे काम केले आहे.. येथे दोन नमुने करवला येयील हसन हुसनच्या कबरीचे आपल्या तिकडील डोले करितात त्या नमुन्याप्रमाणे चांदीचे भले मोठाले बनविलेले आहेत. येथें आरसे, हंडया झाडे, वगैरे सामान लाखो रुपयांचे आहे. येयें एक आग्र्याच्या ताजमहालाच्या नमु न्याप्रमाणे लहानशीशी इमारत बांधलेली आहे. येथे पाण्याचा हौद फार मोठा आहे. त्याच्या मध्य भाग इकडून तिकडे जाण्यास एक लोखंडी पूल बांधिला आहे. केसरी बागेत पांच पन्नास मशीदी आहेत. त्या सर्वांस कळस सोन्याच्या मुलाम्याचे आहेत. ह्या शह- रांतून गोमती नदी वाहात आहे. तिजवरून लखनौस मुसलमानी अंमल असतांना एक लोखंडाचा पूल बांधिलेला आहे. त्याचे काम फार मजबूद असून पाहण्यासारखे आहे.
 लखनीपासून अयोध्या क्षेत्र ४० कोस आहे. तेथपर्यंत रेल गा- डीचा रस्ता अद्यापि तयार झाला नाहीं. ह्याकरितां घोडयाच्या गाड्यांतून लोक तेथे जातात. लखनौस गोमती नदी आहे. हे तीर्थ मोठे आहे. आता पुरे करितों. लोभ असावा हे विनंती. ता० ७ माहे जानेवारी सन १८७२३०.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.