या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४

नेली तेव्हां खालीं नुसती जागा उरली. नंतर पुढे राजा विक्रमानें रामायणाच्या आधारें त्या राजवाड्यांतील वेगवेगळ्या मंदिरांची ठिका- णें कायम करून तेथें नवीन इमारती बांधावल्या.त्यांत दशरथ राजाचा महाल, कीसल्या, सुमित्रा, कैकयी ह्यांचे महाल श्री शिते- चा महाल, तिची पाकशाळा, श्री रामचंद्राची लहानपणची खेळ- ण्याची जागा, रंगमहाल, दरबारची जागा, अशा अनेक इमारती आहेत. त्या सर्व ठिकाणीं श्री रामचंद्राच्या वगैरे मूर्ती स्थापिल्या आहेत त्यांचे दर्शन होते.
 येथे श्री रामचंद्राचा जन्म झाला त्या ठिकाणी औरंगजेब पाद- शहाने मोठी थोरली महजीद बांधावली आहे. त्याप्रमाणेच त्रेतायुगा- चा राम म्हणजे त्या काली स्थापन केलेल्या मूर्ती (ह्या श्री राम, शिता, लक्ष्मण, भरत, शत्रुन वगैरेच्या सोन्याच्या आहेत.) ची स्थापना केली आहे, आणि तेथे देवालयही बांधले आहे. त्या देवा- ल्यावरही सदर पादशहानें एक महजीद बांधिली आहे, आणि ति- सरी महजीद स्वर्गद्वाराच्या ठिकाणी बांधली आहे.
 येथें मुख्य यात्रा म्हटली म्हणजे श्रीराम घाटीं शरयू नदीचे स्नान व त्याप्रमाणे स्वर्ग द्वारी ब्रह्मघार्टी शरयू स्नान आणि तीर्य- श्राद्ध आणि वर सांगितलेल्या ठिकाणच्या देवांचीं दर्शने इतकेच काय ते. येथें दक्षगी ब्राम्हणांची सुमारे ३०,३५ घरे आहेत. बाकी सर्व तद्देशी लोक आहेत. येथें तांबड्या तोंडांची माकडे पुष्कळ आहेत. त्यांचा यात्रेकऱ्यांस फार उपद्रव होतो.रस्याने जातांना ते त्याच्या डोक्यावरचें पागोटे उचलून नेतात.येथील हवा पाणी फार चांगले आहे.येथे मार्गशीर्ष शुद्ध ५ स श्री रा- मचंद्राचा सीतेशी विवाह झाला.त्याचा मोठा समारंभ होतो. यात्रा सुमारे २ लाख जमते. मोठ मोठाले राजे रजवाडे लोकही येतात. हा समारंभ पाहण्यासारखा आहे. आतां पुरे करितों. लोभ असावा हे विनंती.

एडिटराचा मित्र

एक फिरस्ता.