या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३५ अयोध्येपासून काशीपर्यंत रस्ता व काशींतील मुख्य देवता. मुक्काम श्रीक्षेत्र वाराणसी ता० ५ जानेवारी सन १८७२ ज्ञानप्रकाशकर्ते यांसः -- वि० वि०. आपणाकडे मी नेहमी इकडील खबर लिहून पाठ वितो तिला आपण आपल्या सुंदर पत्री जागा देतां हे पाहून मला आणखी कांही ज्यास्त हकीकत लिहिण्यास उमेद आली आहे. ह्यास्तव हल्लीं ह्या चार ओळी आपणाकडे लिहून पाठ- विल्या आहेत तर त्यांस कृपा करून येत्या अंकांत जागा द्यावी हीच प्रार्थना आहे. महाराज गेल्या पत्री श्री अयोध्या क्षेत्राची माहिती म्यां यथा- मती आपणाकडे पाठविली. हें क्षेत्र आउच प्रांतांत आहे. ह्या प्रांताचा राज्यकारभार चीफ कमिशनर पाहतो. तो नेहेमी लख नौस राहतो. अयोध्येस कानपूर मार्गे येण्यास लखनौ पावेतों रेलगाडीची सडक मिळते. लख- झाली हिला आउध आणि रोहिलखंड रेल्वे असे नांव आहे. ह्या रेल्वेस कानपुरापासून आरंभ होतो. ह्या रेल्वेची सडक हल्ली लखनी पावेतो तयार असून तिजवरून वाफेनें चालगारी गाडी जाण्या येण्याचा क्रम सुरू आहे. नौपासून फैजाबाद पावेतोही सदर प्रकारची सडक तयार आहे, परंतु मध्ये कांहीं कांही ठिकाणी काम होणें आहे तें लव- करच संपेल अशी येथे माहिती मिळते. ते काम संपलें म्हण- जे सुमारें पेस्तर महिन्यांत त्यावरून गाडी सुरू होईल असा अं दाज आहे. ही रेलगाडीची सडक जीवनपूर मार्गे श्री वाराण- सी पावेतो नेली आहे व हें कामही मोठ्या झपाटयाने चाल आहे. याच हे काम संपले असते, परंतु महाराज यंदा पर्जन्यानें जी इकडे अति वटी केली तिच्या योगे पुष्कळ तयार झालेले काम