या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
काशीयात्रा


पुण्याहून प्रयाग - तेथील यात्रा.


 ज्ञानप्रकाशकर्ते महाराज -


 वि०वि०. आम्ही ३०/३५ असामी तारीख ३१ आक्टोबर रोजी सकाळी श्री काशीयात्रेस निघालों तो प्रथमतः पुण्याच्या स्टेशनावर आमच्या कांहीं नौकर लोकांस थर्ड क्लास टिकिटे घेण्याचा प्रसंग आला, तेव्हां त्यांनी तीन चार कल्याणचीं टिकिटें घेण्याकरितां पैसे दिले आणि सुमारें घटका दीड घटका रात्र होती म्हणून घाईने टिकिटे न तपासतां ते गाडींत बसले.नंतर नऊ वाजण्याच्या सुमारास गाडी कर्जतच्या स्टेशनावर आली, तेव्हां आम्ही सदहू इसम कोठें बसले आहेत व त्यांनी टिकिटास किती पैसे खर्च केले ह्याची चौकशी केली. तेव्हां एक असामीस कल्याणचे टिकिट आणि बाकीच्यांस बदलापुरची टिकिटे मिळाली असे कळले. तेव्हां कदाचित हस्तदोषानें टिकिटें देणारानें ही चुकी केली असेल असे समजून प्रत्येकाने भाडयाचे पैसे काय दिले ह्याची चौकशी केली तो पुण्यापासून कल्याणचे टिकिटास भाडें रु० २ साडे दहा आणे प्रमाणे एकेकाने दिले असे आढ- ळले. सदर भाड्याचा आकार दर टिकिटाचा म्हटला म्हणजे दोन रुपये पावणेआठ आणे होतो असे असून येथेही पुनः नजर चुकी- नेच त्या गरीबांस ज्यास्त भाडे पडले,तर एडिटर महाराज, क्षणोक्षणी स्टेशनावरील लोक अशा चुका करतील तर गरीब लोकांची फार बुडवणूक होणार आहे.पहा, एकादा गरीब कंगाल मिक्षा मागून काही पैसे जमा करून एकाद्या गांव रेल्वेने जाईल आणि जर त्यास अपुरे टिकिट स्टेशनावरून मिळेल तर उतरण्याचे वेळी त्यांचे टिकीट अपुरे सबब त्यास रेल्वे कंपनीच्या कायद्याप्रमाणे