या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 येथे कारागीर लोक हर जातीच्या कसवांत फार उत्कृष्ट आढ- ळतात. जडावाचें कान तर येथें अनुपम्य रांतीचे बनतें. तांबे, पितळ वगैरे धातूंचें काम चांगले होऊन स्वस्तें पडतें. लांकडी काम, दगडी काम ह्याचीही तन्हा सदहू प्रमाणेच इकडे हल- वायाच्या दुकान पक्काने बहुत तोफा होतात व त्यांत विशेष इत- काच कीं, ती घृतपक्क असल्यामुळे ब्राह्मण प्रभृति सर्व ज्ञातीचे लोक खातात. हजारों मण पक्कानें नित्य तयार होतात आणि वर लिहिलेली मोकळीक असल्यामुळे तितकी ती दररोज खपतात. नेहमीचे एतद्देशीय रहिवासी लोकांच्या येथे हलवायाच्या घरच्या पुऱ्यांचा व लांडवांचा नित्य खर्चाच्या मानाने दोन शेर चार शेरां- चा रतीब लावलेला असतो. जे दक्षणी लोक नवीन येऊन राहिलेले आहेत, त्यांच्या येथे मात्र नित्य सर्व प्रकारची सोय घरीं होते. बाकी ठिकाणी रगडून बाजारांतील जिनस चालतात. रांग- ड्या ब्राह्मण हलवायाच्या दुकानची पक्की रसोय दक्षणी यात्रेक- ज्यास श्राद्धादि कर्मास प्रशस्त आहे. एक दामाजीपंत कमरेस असले ह्मणजे जेवायाला, निजायाला, हुक्का ओढायाला वगैरे सर्व प्रकारची सोय देशाटण करणाऱ्याची निमिष मात्रांत होते.
 रेल्वेच्या संबंधाने येथील व्यापार कमी झाला असे आम्हीं वर लिहिले आहे तरी येथे फार मोठा व्यापार आहे. आह्मी पितांबर घेण्यास एके दुकान गेलो होतो तेथें तीन मजला पितांबर भरले होते, असाच प्रकार हर जिनसांचा.
 रेल्वे आणि तारायंत्र ह्यांनीं मजा केली खरी, परंतु त्यापेक्षां जे लोक तेथे नौकरीवर आहेत त्यांच्या सारखे मजेदार लोक दुनियेत आढळणे मुष्कील. काय सांगावें एडिटरबावा, इकडे रुपये ७ दरमहा झाला ह्मणजे त्याला "बाब" हें उपनामाभि- धान प्राप्त होतें. तेथें स्टेशनावर शोध केला तो "बाचू" ह्या शब्दाचा अर्थ आपल्या इकडे "राव" अगर "पंत" म्हणतात, त्याप्रमाणेंच आहे असे समजले. आतां आम्ही रेल्वे स्टेशन