या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४

सावे लागते. केवळ टिकिटेच काढावयाची असली तरी दे खोल सदरीं सांगितलेली भयंकर चिरी मिरि द्यावी लागते. ति च्या शिवाय गत्यंतरच नाहीं.
 आतां एडिटरराव उत्तर हिंदुस्थानांतील रेल्वे कंपनीने जी सु- खाची साधने करून ठेविली आहेत तो सर्व ह्या आगांतुक का रणामुळे व्यर्थ होतात. ह्याचा बंदोबस्त होणे मला तर कठीण च दिसतें.अस्तु प्रालब्ध योग म्हणायाचा.
 आतां सदरी जी हकीकत म्यां लिहिली आहे ती सर्वत्र आहे असे समजूं नये.
 (आम्ही आतां गयेस जाण्याचा बेत केला आहे. तिकडे जाऊन आल्यावर पुनः आपली भेट पत्रद्वारे घेऊं. येतों लो- भ असावा हे विनंती.)

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.

मानमंदीर.

मु० श्री वाराणशी ता०

जानेवारी सन १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
 वि० वि०. गेल्या पत्री भ्यां तुम्हास लिहून कळविले होते की, आम्ही गयेस जाणार, परंतु एडिटरबावा आमचा मुक्काम येथे आ णखी काही दिवस आहे ह्याकरितां येथील प्रसिद्ध प्रसिद्ध ठिकाणची हकीगत तुम्हास लिहून कळवावी असा ग्यां बेत केला आहे आणि ह्याला अनुलक्षून हे आजचे पत्र लिहितो. आजच्या पत्री तुमच्या वाचकांस ह्या क्षेत्रांतील मानमांदेल आणि त्या मोहोल्यांत जी दुसरी मोठमोठाली देवालये आहेत त्यांचे वर्णन करितो.
 मानमंदिल ही एक जुनी वेधशाळा आहे व ह्याच्या नजीक जो गंगेस घाट आहे त्याला माननंदील घाट ही संज्ञा आहे. त्या भव्य इमारतीनें घाटाला फारच शोभा आली आहे आणि ह्या इमार-