या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५

तीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या आटाळीवर उभे राहून गंगा प्रवाह अवलोकन केला म्हणजे मोठीच मौज दिसते. ह्या मंदिरांत जाण्याच्या द्वाराच्या आसपास पुष्कळ जुन्या झिजलेल्या मूर्ति दृष्टीस पडतात. त्यांत बऱ्याच मूर्ति मारुतीच्या आहेत. येथे एक जयपूरच्या राजाचे उंच काठीला बांधलेले निशाण फडकत असतें. ह्याचे कारण असे की, हा सर्व मोहोल्ला त्याचा म्हणविला जातो आणि हल्लीच्या राजे साहेबांच्या पूर्वजांपैकी कोणी जयसिंह म्हणून जयपूरचा राजा होऊन गेला त्याने ही मानमंदिल नामक वेधशाळा बांबविली. ह्या वेधशाळेपासून घाटावर जी गली जाते तीत दालभैरवेश्वराचें शिवालय आहे. ह्या देवावर जर अय- र्षण पडले तर संततधार धरितात असा येथे सांप्रदाय आहे. हा महादेव देवालयाच्या मध्यभागी एक खोल कुंड आहे त्याच्या मध्ये आहे आणि जेव्हां देवाला गंगोदकाने कोंडून टाकितात तेव्हां नुसते कुंडच भरून राहात नाहीत तर देवालयाची सर्व कपाटे बंद करून ते देखील तुडुंब भरतात, अशी येथे माहिती मिळते. ह्या देवाची यात्रा दारिद्रमोचनदायकही आहे. येथे चतु. र्भुज अथवा श्री विष्णु आणि शीतला देवी हे देव आहेत. दालभैरवाच्या देवालयाजवळच सोमेश्वराचें देवालय आहे. ह्या देवाचे आराधन ययाशास्त्र केले म्हणजे सकल व्याधीचा परिहार होतो. कोणी थट्टेखोराने आम्हास असा प्रश्न केला कीं, सकल व्याधीचें परिहार स्थान सोमेश्वराचे देवालय आहे तर इंग्लिश दवा- खाने आणि नेटिव डाक्तर ह्यांच्या घरीं रोग्यांची गर्दी कां? आम्ही पडलों शहाणेच तेव्हां प्रश्नास कांहीं तरी उत्तर द्यावे ह्मणून "भा- वेन देव " ह्या वचनाने त्याला गप्प बसविले. कां? एडिटरराव आम्ही शहाणे खरे किंवा नाहीं? आम्हाला तर वाटते की, आम्ही मोठे शहाणे. अस्तु विषयांतराची क्षमा असावी. ह्या देवालयापासून नजीकच एका गल्लीत एक बऱ्हान देवीचे देवालय आहे.ह्या देवतेच्या आराधनाने हाती पाय सुजलेले लोकांची व्याधी दूर होते.