या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७

आहे आगे कला दीड जवाची आहे. है। यंत्रे दगड आणि चुना ह्याची भली मजबूत बांधलेली आहेत. ही यंत्रे बांधविते वेळी जे भूमिति शास्त्राकडे लक्ष्य दिले आहे त्याचें तें यंत्र पाहतांना आश्चर्य वाटल्यावांचून राहवतच नाहीं. ह्याप्रमाणे एडिटर महाराज राजा जयसिंहाने ज्योतिःशास्त्राचा विजय करून वेधशाळा बांधण्याचा प्रचार सुरू केला.ह्या वेध शाळेच्या योगाने ग्रह, तारे व इतर नक्षत्रे ह्यांच्या गति, स्थिति वगैरे प्रकार सुगम रीत्या कळू लागले. ह्या पांच ठिकाणी वेग वेगळ्या उया वेधशाळा बांधविल्या त्यांचे कारण इतकेच कीं, एके ठिकाणी जे गणित अगर वेध एका विवक्षित वेळी केले तर ते वेध अगर गणित त्या विवक्षित वेळी दुसऱ्या ठिकाणी केल्याने मिळते किंवा चुकतें हैं पाहतां यावे. ह्या प्रत्येक ठिकाणी जे वेध होत ते नित्यशः आणवून प्रत्येक ठिकाणच्या रेखांशाचे अंतर काढून नंतर ते मिळाले तर खरें, नाहीं पेक्षां पुनः तपासणीस तो राजा पाठवी. परंतु त्याच्या ह्या वेधपत्रकांत अंतरच येत नसे. जसे गणितानें येईल तसेंच वेवाने येई. इतके बरोबर काम त्याने केलें. ह्याप्रमाणे श्री वारा- णशी येथील वेधशाळेची आणि तेथील यंत्रांची हकीकत आहे. ती आमच्या एका मित्राने आम्ही ही वेवशाळा पाहण्यास गेलो त्या वेळी सांगितली. ती आपणाकडे पाठविली आहे. कृपा करून छापावी.
 हल्ली या यंत्राच्या योगानें ग्रहणे, तिथी वगैरे मात्र वर्तवितात. युरोपियन वगैरे जे कोणी ह्या क्षेत्रों येतात ते या वेधशाळेत आ ल्यावांचून राहात नाहीत. तिगस्ता डयूक आफ एडिंबरोची स्वारी हिंदुस्थानांत देशाटनास आली होती तेव्हां येथे आली होती. हें मंदिर व त्यांतील यंत्रे फार पैसा खर्च करून व अक्कल खर्च करून बांधिली आहेत तरी जे ब्राम्हण ह्या मंदिरों राहतात आणि त्यांस पाहण्यास येणाऱ्या लोकांपासून बरेच पैसे मिळतात तथापि त्यांची झाड झुड देखील बरोबर रीत्या त्यांच्याने ठेववत नाहीं