या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८

ही मोठी दुःखकारक गोष्ट आहे. ह्या यंत्राचे ने आते सूक्ष्म भाग आहेत ते कित्येक ठिकाणी अगदी झिजून गेले आहेत व कित्येक ठिकाणी माती सांठून सांठून बुजून गेले आहेत.
 वेधशाळेत गेले म्हणजे पाहिल्याने "मिति यंत्र आपल्या दृष्टीस पडते. ह्याची जी एक भिंत आहे ती अकरा फूट उंच आणि ९ इंच जाड असून क्षितिजाच्या पातळीत आहे. ह्या यंत्राच्या योगे मध्यान्हास सूर्य आला म्हणजे त्याची उंची वगैरे मापतां येते. ह्या यंत्रापासून थोड्याच अंतरावर एक फक्त दगडी आणि दुसरे केव- ळ चुन्याचे अशी दोन भली मोठी वर्तुळे बांधलेली दृष्टीस पडतात. त्यावरही अंश, कला वगैरे भाग पाडलेले आहेत, परंतु त्याचा उप- योग काय करितात तो आम्हास कोणी तेथे सांगितला नाहीं. यंत्र सम्राट अथवा यंत्रराज हें एक यंत्र येथे बांधलेले आहे. ह्याची भिंत ३६ फूट लांब आणि १|| फूट रुंद आहे. ती क्षितिज्याच्या पातळीत आहे. ह्याचें एक टोक ६ फूट ४ | इंच उंच आहे. आणि दुसरें २२ फूट ३|| इंच हळू हळू उंच उंच होत गेले आहे आणि ते उत्तरधृवाच्या अगदर्दी सम रेषेत आहे. ह्या यंत्राच्या योगानें क्षितिज्यापासून एकाद्या ग्रहाचे अगर ताऱ्याचे अंतर वगैरे काढतां येते. येथे आणखी ३ ४ दगडी यंत्रे आहेत. त्यांची नांवें आतां मला आठवत नाहींत. लहान लहान यंत्रसम्राटही आणखी पु.कळ येथे बांधलेले आढळतात.
 ह्यांच्या जवळच चक्रयंत्र आणि दिगंशयंत्र ही आहेत.
 मानमंदिराजवळच घाटावर नेपाळच्या राजाने बांधविलेले एक देवालय आहे. हे अवश्य पाहण्यासारखे आहे. हे देवालय बांध- ण्याची तन्हा इतर जी देवालये ह्या क्षेत्री आहेत त्यांच्या पासून फारच भिन्न आहे. असेना वापडी आपणास काय? हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.