या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६

वर सूर्यनारायणाचे देऊळ आहे. हे देऊळ बुंदीकोट्याच्य राजाने बांधविले आहे. ह्या देवळांत मध्यभागी सूर्ययंत्र भले मोठे पाषाणाचे आहे. त्याची पूजा परमादराने लोक रविवार करितात.ह्या देवळांतच एक कोठडी आहे तेथें होम कराव लागतो. होम होते वेळी यजमानास सूर्यपुराण श्रवण करावे ला गतें. ह्या देवाचें नांव सांत्रादित्य आहे. ह्याची कथा अशी आहे कीं, श्री कृष्णाचा मुलगा जांबवतीच्या पोटी झालेला जो सां त्याला कांहीं पातकामुळे कुष्ट भरले. तेव्हां जांबवतीने श्री कृ. प्णास त्याची कुष्टरोगापासून मुक्ती व्हावी ह्मणून कांहीं तरी व्रत सांगावे ह्मणून विनंती केली, तेव्हां कृष्णानी तिला सांगितले की मुलानें श्री वाराणशी क्षेत्री जावे आणि तेथे एक तलाव बांधून त्यावर श्री सूर्यनारायणाचे देऊळ बांधावें आणि नित्य त्या तळ्यांत स्नान करून देवळांतील सूर्ययंत्रावर अर्घ्यप्रदान करावे म्हणजे कुष्टरोग दूर होईल. ह्याप्रमाणे सांबाने आचरण केले तेव्हां त्याचें कुष्ट गेले. ह्या सूर्यकुंडासमीप अष्टांगभैरवाची मोर्ति आहे ती औरंगजेत्र पादशहाने छिन विछिन्न केली आहे.
 इकडेच ध्रुवेश्वराचे देवालय आहे. ह्यांत ध्रुवऋषीन स्थापित महादेवाची शाळुका आहे. आतां पुरे करितो हे विनंती

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.

काळभैरव काशीचे कोतवाल.

मुक्काम श्री वाराणशी.

ता० जा० १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांसः
 वि० वि०. अहो एडिटर बावा आलीकडे आम्हास विस्मरणाची बाधा फारच झाली. ती कोठवर म्हणाल तर तारीख देखील ध्यानां- त राहिनाशी झाली. नुकतें आज सकाळी पंचांग पाहिले आणि ता० कितवी ती घोकली. असे असतां दोन पंचांगाचे बेरजे