या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बरोबर एक दशांगाची गोळी होऊन आमच्या स्मरणात धूप बनून गेलो.वाः धन्य तुमची आणि आमची. अस्तु.
 आजच्या पत्री काशी क्षेत्राचे कोतवाल जे काळभैरव ह्यांच्या मंदिराचें आणि त्या मोहोल्याचे घोडेंसें वर्णन तुमच्याकडे पाठवितो. त्याला आपण कृपा करून जागा द्या.
 भैरवनायाचें मंदीर श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिरापासून सुमारे एक मैलभर लांब आहे. काळभैरवाचा अंमल सगळ्या पंच क्रोशीत आहे. ह्यांचा सोटा मोठा कठीण आहे. ह्या सोड्याचे नांव दंडपाणी. आतां दंडपाणी ह्या शब्दाचा अर्थ पाहूं गेले तर ज्याच्या हातांत दंड तो. व अशा नांवाचा एक शंकराचा दूत होता. असे असतां येथे दंडपाणी याचा अर्थ काळभैरवाचा सोटा असा सर्व लोक समजतात. ह्या दंडपाणीचे देवालय काळभैरवाच्या देवालया- जवळच आहे. काळभैरवाच्या देवळांत एक चौघडा आहे. ब्रम्हरा- क्षसादि पिशाच योनीतले जिवास व पातकी प्राण्यास काळभैरव शिक्षा करितात. दंडपाणीच्या देवळांत गेले म्हणजे तेथे एक चार उंचीचा भला मोठा पाषाण आहे. इतकेच काय ते दृष्टीस पडतें. ह्यांच्या दर्शनास लोक प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक मंगळ- वारों फार जातात. त्या दिवशी ह्या देवास एक रुप्याचा मुखवटा घालितात. आतां खुद्द काळभैरवाच्या देवळांत दर्शनास जे लोक जातात त्यांच्या पाठीवर काळभैरवाचा सोटा बसल्यावांचून राहतच नाहीं. आतां हे समजण्याकरितां मला येथे थोडेसे काळभैरवाच्या आंतील देवळाचे वर्णन केले पाहिजे. ज्या ठिकाणी देवाचा देव्हारा आहे तें स्थल अथवा ती खोली तीन खण + दोन खण अशा लांबी रुंदीची आहे. व त्या पुढे तीन खण लांबीचे बाहेरील खुले दालन आहे. ह्या दालनांत मधल्या खणांत दरवाजा देवघरांत जा- ण्याचा आहे. ह्या दरवाजाने यात्रेकरू देवदर्शन घेऊन परत जाऊं लागला म्हणजे त्यास बाहेर दोन्ही आंगास काळभैरवाचे दोन निशी- म भक्त चौरंगावर बसलेले असतात. त्यांपैकी एकजण गांठितो