या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी आहे की, कोणे एके समयीं श्री विष्णूनी काशी क्षेत्रीं ये- ऊन आपल्या चक्राने एक कूप खणिला आणि त्याला चक्रपुष्कर- णी हैं नांव दिले. त्या कूपाचें सौंदर्य पाहून विष्णूस फार संतो- ष झाला. आणि ते त्या कूपाच्या उत्तर भागी तपश्चर्येस बसले, इतक्यांत श्री शंकराची स्वारी तेथे आली. आणि तो कूप पाहून आनंदानें नृत्य करूं लागली. हें नृत्य करितां करितां शंकराच्या कानांतील कुंडल त्या तीथीत पडले तेव्हांपासून पुढे त्या कूपाला मणिकर्णिका हे नांव प्राप्त झाले. आतां मागाहून लिहूं. हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.

मणिकर्णिका, चक्रपुष्करराण आणि वृद्धकाळेश्वर.

मुक्काम श्री वाराणशी ता०

जानेवारी सन १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस-
 वि०वि०.गेल्या पत्री आपणाकडे मणिकर्णिका तीर्याची कथा लिहून पाठावेली.आजही आणखी थोडीशी लिहून नंतर दुसऱ्या ठिकाणची माहिती लिहितों. तिला आपल्या सुंदर पत्रों कृपा करून जागा द्यावी.
 मणिकर्णिका कुंडास मुक्तिक्षेत्र आणि पूर्ण शुभकरण ही नांवें आहेत. लोकांत ह्या कुंडास माणिकर्णिका हें नांव कां पडले त्याबद्दल आणखी अशी कथा प्रसिद्ध आहे कीं, कोणे एके स- मयीं ह्या कुंडावर शंकर आणि पार्वती क्रीडा करीत होती तेव्हां पार्वतीच्या कानांतील एक तानवड त्यांत पडले ह्यामुळे त्यास मणिकर्णिका हें नामा- भिधान त्यास प्राप्त झाले. सारांश काय तर कानांतला मणी त्यांत पडला. तो शंकराच्या कानांतील पडलेला असो किंवा पार्वतीच्या कानांतील असो म्हणून त्या कुंडास मणिकर्णिका हैं नांव मिळाले. नाहीं तर त्याचे पहिले नांव मागल्या पत्र लिहिल्याप्रमाणे चऋपु- प्रकरणी हें होतें व तें हल्लींही प्रसिद्ध आहे.