या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१

उणून शंकराचे आराधन केले तेव्हां ते ह्या ठिकाणी तपश्चर्येस बसले होते. कार्तिक महिन्यांत येथे मोठा मेळा जमतो.
 मागेकार्णका घाट ही सर्व काशी क्षेत्रांत अत्यंत पवित्र जागा असून ती ह्या क्षेत्राचा मध्य बिंदु आहे असे मानल्यास चालेल. कारण ह्या ठिकाणापासून जर रेवा काढून काशी क्षेत्राचे दोन भाग केले तर ते परस्पराशी अगदी जवळ जवळ सारखे होतील. ह्या घाटाच्या दुसऱ्या तबकडीच्या पायऱ्या चढून वर गेलें म्हणजे सिद्ध विनायकाचें देऊळ लागते. ह्या देवळांत सिद्ध विनायकाची मूर्त असून दोन्ही आंगास सिद्धांबुद्धीच्या मूर्ति उभ्या आहेत. वि नायक राजाच्या चरणापाशीं एक लहानसा मूषक आहे.
 मणिकर्णिका घाटाच्या जवळ शिंदे आणि भोसले ह्यांचे घाट आहेत. शिंद्याचा घाट बायजाबाई शिंदे ह्यांनी बांधविला आहे. ह्याच बायजा बाईनी ज्ञानवापीचा मंडप बांधविला. शिंद्याचा घाट अगर्दी ओहोरून गेला आहे. त्याचे बुरूज कोसळून पडले आ हेत. जशी धरणीकंपाने जमीन फाटते आणि वरील इमारत आंत खचते त्याप्रमाणे ह्या घाटाची स्थिति दिसते.
 वृद्ध काळेश्वराचें देऊळ वाराणसी क्षेत्राच्या उत्तर भागांत आहे. हे देऊळ फार प्राचीन आहे. प्रथमतः ह्यास १२ चौक होते असे सांगतात. परंतु हल्लीं सात उभे आहेत. पैकी कित्येक अगदी मोडकळीस आलेले आहेत. ह्या देवळाच्या आवारांत एक बगीच्या होतासा वाटतो. ती जागा आणि पडलेल्या पांच चौकां. ची जागा ह्यांत लोक घरे बांधून राहिले आहेत. प्रथमतः हे देवालय बांधून तयार झाले असेल तेव्हां खरोखरीच फार शोभायमान दिसत असेल. ह्या देवाची कथा अशी आहे की, सत्ययुगी कोणी एक राजा वृद्धापकाळी अत्यंत रोगग्रस्त झाला तेव्हां तो का- शीस आला.आणि ईश्वराचें आराधन करूं लागला.ह्या त्याच्या आराधनाने महादेव फार संतुष्ट झाले. आणि राजास रोग- मुक्त केला एवढेच नाही तर त्यास यीवन दिले. नंतर त्या राजाने