या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२

है वृद्ध काळेश्वराचे मंदिर बांधले. आणि तेथें महादेवाची स्थापना केली. नंतर शंकरानी प्रसन्न होऊन असा वर दिला कीं, जो कोणी वृद्धकाळेश्वराची आराधना करील व्यास कोणत्याही रोगाची बाधा होणार नाही. व तो दीर्घायु होईल. ह्या देवळांत शिरतांना पहिल्याने महा वीराचें दर्शन होतें. पुढे काली देवीचे दर्शन होते. तिच्या पुढेंच महादेवाचे दुसरे एक लिंग या राजानें स्थापिलेले आहे त्याचे दर्शन होतें. काळीच्या उजव्या आंगास पार्वती आणि गणपतीच्या मूर्ति आहेत. आणि पार्वतीच्या डाव्या आंगास भैरवनाथ, सूर्यनारायण, हनुमान, आणि लक्ष्मी नारायणाच्या मूर्ति आहेत. येथे दोन कूप आहेत त्यांपैकी एका कुपांतील पाण्यास मनस्वी घाण येते आणि तिनें तो सगळा चौक भरलेला असतो. कूपाच्या पाण्यांत व्याधिस्त लोक स्नाने करितात.बारा वर्षे सारखे ह्या कूपोदकाने स्नान केले तर कुष्टादि महान रोग दूर होतात असे सांगतात. ह्या कूपोदकास विशेषेकरून गंधकाची फारच घाण येते. ह्या कूपाच्या शेजारी दुसरा एक कूप आहे. ह्यांतील पाणी गोड असून चांगले पाचक आहे ह्या चौकांतून दुसऱ्या चीकांत गेलें ह्मणजे तेथे भले मोठे अश्वय आणि निंबाचे दोन वृक्ष दृष्टीस पडतात. तिसऱ्या चौकांत दोन भाग आहेत. पैकी एका भागांत वृद्ध काळेश्वराचें लिंग आहे.
 ज्या चोकांत कूप आहेत त्याच्या उत्तरेस एक लहानसे आवार आहे. त्यांत मार्कंडेश्वर आणि दक्षेश्वर हे दोन देव आहेत. वृद्ध काळेश्वराच्या देवळा बाहर पडून त्या देवळाच्या दक्षिणेक- डील नितीच्या बाजूने रस्यांतून चालले ह्मणजे त्यांच्या कोपन्यास अल्पमृतेश्वराचे देऊळ लागतें. ह्या देवाची आराधना दीर्घायुत्व देते. वृद्ध काळेश्वराच्या देवळांत दर रविवारी मोठा मेळा जनतो आणि श्रावणा आदितवारी मोठीच यात्रा जमते.
वृद्वकळेश्वरार्पणमस्तु.

एडिटराचा मित्र फिरस्ता.