या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिवोदास हा बौद्ध धर्मी होता वगैरे.

मु० श्री वाराणशी ता०

जानेवारी १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस-
 वि०वि०. काल रोजी आह्मी ह्या क्षेत्री फिरत असतां एका मिशनरी साहेबांची व आमची गांठ पडली. तेव्हां त्यांनी चालीप्र- माणे आम्हावर झडप घातलीच आणि बराच वेळ त्यांचे व आमचें संभाषण झाले. त्यापैकी येथे थोडेसे लिहितो. नंतर आमचा जो क्रम आहे त्याप्रमाणे ज्या ज्या देवालयांत आह्मी दर्शनास गेलों तेथील हकीकत लिहितो. तिला कृपा करून आपण आप- ल्या सुंदर पत्री जागा द्या. नाही ह्मणूं नका हो बाबा.
 मिशनरी बाबांनी काशी क्षेत्री श्री विश्वेश्वराचें आधिपत्य प्राचीन काळापासून आहे ह्याबद्दल बरेच वेळ संभाषण केले. नंतर त्यांस व त्या सहित इतर सर्व देवांस वाराणशी क्षेत्रांतून दिवोदास राजाने हाकून दिलें, ह्याबदलही संभाषण केले. दिवोदास राजाची कथा अशी आहे कीं, कोगे एका समयी वाराणशी क्षेत्रीं दिवोदास नामें राजा राज्य करीत होता. तो परम धार्मिक, पुग्यशील, नीतिमान इत्यादि सर्व गुणांनी संपन्न होता. असें असतां देवांचें आणि त्याचे वाकडे आले आणि त्यानें श्री विश्वेश्वर प्रभृति सर्व देवतांस वाराणशीतून हाकून लाविले. श्री शंकरास वाराणशीवांचून इतर ठिकाणी तर चैन पडेना आणि दिवोदास राजा तर त्यांचा त्या नगरीत प्रवेश होऊं देईना. तेव्हां युद्ध प्रसंगाने दिवोदासास जिंकावे असा बेत सर्व देवांनी केला.प- रंतु त्यांतही ते फसले. पुढे दिवोदासाच्या हातून कांहीं तरी पातक घडवावे आणि त्याच्या पुण्याईंत कांहीं कमतरता आणून त्यास राज्यभ्रष्ट करावें अना बेत त्यांनी केला. परंतु तोही निम्फल झाला.मग सर्व देव उगीच बसले.त्यांस काय करावे हे सुचेना. शेवटी श्री गजानन महाराजांनी देव सभेत पुढे येऊन