या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४

विडा उचलला की, मजकडे जर हे काम सोपविले तर भी दि. वोदासास वाराणशींतून बाहेर काढितो. अशा प्रकारचे वचन लंबोदर महाराजांचे ऐकतांच सर्व देवांस परम संतोष झाला आ. णि भोळ्या शंकरांनी त्यास तसे करण्यास आज्ञा दिली. नंतर गणपतीनी वृद्ध ब्राम्हणाचे रूप धारण केले आणि दिवोदास क चेरीत प्रवेश केला. दिवोदासानें गणेश भटजस अत्यादरें आ सन वगैरे देऊन अःपल्याजवळ बसवून घेतले आणि प्रत्यक्ष गण- पतीनों भाषणास आरंभ केला. ते भाषण ऐकून सर्व कचेरीतील . लोकांची अंतःकरणें वेधली गेली. राजाची भक्ति तर गणेश भटर्जीच्या भाषणावर इतकी बसली की, "गणेशभटजी वाक्यं प्रमा णं" असे होऊन गेले. पुढे कांही दिवस लोटल्यावर एके दि- यशी राजाने गणेश भटजीस गुरू करून उपदेश घेतला. तेव्हां आतां गुरुदक्षिणा द्यावयाची ती काय द्यावी म्हणून गुरू महाराजां- स प्रश्न केला असतां त्यांनी आज रात्री स्वप्नांत जो दृष्टांत तुम्हास होईल ती गुरुदक्षिणा मला द्या म्हणून सांगतांच राजाने ती गोष्ट स्वीकारली. नंतर त्या दिवशी रात्रौ राजा निजला असतां त्यास स्वप्न पडले की, "तुम्हीं वाराणशीतून बाहेर जावें". नंतर राजा जागा झाला आणि विचार करूं लागला तो त्यास हे सर्व देवांचें कपट आहे असे कळले. परंतु एडिटर दादा गुरुभक्तीविषयीं सत्ययुगीचे लोक परम दृढतर ह्यामुळे त्याने स्वप्नांत झालेल्या आज्ञेप्रमाणे वाराणशीचा त्याग केला आणि सर्व देवांस आंत येण्यास मोकळीक दिली अशी कथा आहे. ह्या कथेवर मिश- नरी साहेबांनी थोडेसे व्याख्यान दिलें तें येथे लिहितों. सदर साहेबांचा अभिप्राय असा कीं, दिवोदास राजा हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता ह्मणून त्यास हिंदूंच्या देवांची मानखंडणा करणे अवश्य वाटे व जेव्हां त्यांचे वर्चस्व काशी क्षेत्री झाले तेव्हां त्यानें सर्व देव तेथून हाकून दिले. त्याचा अर्थ काय म्हणाल तर त्या देवतांची पूजा अर्चा आपल्या राज्यांत त्याने बंद केली.