या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५

अशा प्रकारें व्यवस्था झाल्यावर देवांनी त्याचा पराभव करून तर नाहींच, परंतु कपटाने काशी हस्तगत करून घेतली. साहेब म्हणाले कीं, आम्हास असे वाटतें कीं, ज्या काळी बौद्ध धर्माचा हास काळ आला, त्याच वेळी फाशी देवांच्या हस्तगत झाली, असे आमचे अनुमान आहे. असो, कांहीं कां असेना.आम- च्या कथेंत दिवोदास राजास कैलासात पुढे शंकरांनी नेले असे सांगितले आहे.
 काय हो एडिटर बाबा, विश्वेश्वराच्या नगरीच्या मागे लचांडे तरी! दिवोदास राजाने तिला हिरावून घेतलीच होती. अहो आलीकडे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी औरंगजेच पादशहाने ती घेतली तेव्हां श्री विश्वेश्वरादि सर्व देवांची स्थाने समूळ भ्रष्ट केली. सारांश काय? चांगले ह्नगजे कोणाला नको असे नाही.
 दिवोदासेश्वराचे देऊळ मीरघाटी आहे.येथे एक "वीस बांदुक" ह्मणून वीस भुजांचा देव आहे.येथे एक कूप आहे. त्याचे नांव धर्मकृप आहे.मुख्य देवळांत जाण्याच्या वाटेवर धर्मेश्वराचे देवालय आहे.येथून थोड्याच अंतरावर विशालाक्षी देवीचें आलय आहे. मीर घाटाच्या पायऱ्या फार सोप्या आहेत."
 येथून जवळच औसानगंजा शेजारी नागकुवा महला आहे. त्यांत नागकुवा मोठा प्रसिद्ध कुवा आहे. ह्या नाग कुव्यांत पहिल्या १२ पायऱ्या उतरून गेले ह्मगजे जे पाणी लागते ते अगदी गढूळ आणि घागरे आहे. त्या पाण्याखाली एक लोखंडी पत्रा आहे. तो पत्रा काय तो खालच्या खन्या विहिरीचे द्वार.येथे पूर्वेच्या आंगच्या भिंतीवर एक लेख आहे. त्यांत संवत १८२५ सांत एका राजाने ह्या विहिरीचा जीर्णोद्वार केला असे लिहिले आहे. येथे ईश्वराच्या लिंगावर न गाची फडी आहे. त्याला नागे. श्वर म्हगतात. श्रावण वद्य ९-१० च्या दिवरीं। दरसाल येथे