या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठा मेळा जमतो. पहिल्या दिवशी बायकांची यात्रा आणि दुसऱ्या दिवशीं फक्त पुरुष लोभ करावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.

विश्वेश्वर मोहोला.

मु० श्री वाराणशी ता०

जानेवारी सन १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांसः-
 वि०वि०. म्यां एका पूर्वीच्या पत्रों आपणाकडे काशीविश्वे श्वराच्या देवळाची योडीशी माहिती लिहून पाठविली होती ती आ पण कृपा करून छापली. आज तेथील विशेष हकीकत लिहितों.
 विश्वेश्वराच्या देवालयाच्या घुमटास आणि वरील शिखरास दगडी इमारतीवरून तांब्याचे पत्रे मारून वर सोन्याच्या वरखाचा मुलामा केला आहे. ह्याचा सर्व खर्च राजा रणजितसिंह जो लाहो- रचा राजा होऊन गेला त्याने केला आहे. विश्वेश्वरापुढे सुमारे नऊ घांटा टांगलेल्या आहेत. त्यांपैकी एक आहे तिचे काम पाहण्यासार- खे आहे. ही घांट नेपाळच्या राजाने टांगली आहे. ह्या देवळांत उत्तरेच्या अंगास जोतें देऊन एक सोपा बांधलेला आहे. त्यांत पु- प्कळ देवता स्थापिल्या आहेत. ह्या सर्व देवता पहिले जे विश्वश्वराचें देऊळ होते आणि जे १७ व्या शतकांत औरंगजेब पादशहानें मोडिले आणि त्यावर एक मोठी महजीद बांधली त्यांतील मार्त आहेत असे सांगतात.
 पहिले विश्वेश्वराचे देऊळ हल्लींच्या देवळाच्या ईशान्येस होतें आणि ते हल्लींच्या देवळाच्या इमारतीपेक्षां सुमारें पांचपट मोठें असावे असे अनुमान होतें. हल्लींचे देवळाच्या शिखराची उंची सुमारे ५० फूट येईलसे वाटते. पहिल्या देवळावर औरंगजेबाने एक मोठी महजीद बांधली आहे. तिचें काम आबडधोबड आहे.