या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 ईस्ट इंडियन रेल्वे जबलपुरापासून सुरू होते.त्यांत पहिला दुसरा, इंटर मिडियेट, आणि तिसरा असे क्लास आहेत.ह्यांत इंटर मिडियेट आणि तिसऱ्या क्लासाच्या गाड्यांचे भाग रिजर्ब मिळतात. येणेकरून उतारू लोकांची फार सोय होते.प्रया- गचें स्टेशन फार चांगले बांधलेले आहे. इकडील मातीच्या विटा फारच चांगल्या होतात. तशा दक्षिणेत होत नाहीत. मुंब- ईंत जसे तांबडे कुजे मिळतात तसे इकडच्या मातीचे कुजे फार चांगले बनतात.प्रयागांत पाहण्यासारिख्या जागा हायकोर्ट, कौन्सिल हाल, रोविन्यु बोर्ड कचेरी, चीफ इंजनेरचे हपीस, पादशाई बाग, आणि यमुनेचा रेल्वेचा पूल हे आहेत. म्हटली म्हणजे त्रिवेणीचे स्थान, तत्प्रयुक्त श्राद्ध, वेणीनाद आणि

त्रिवेणि माधवं सोमं भारद्वाजंच वासुकिं ॥
वंदे अक्षय वटं शेषं प्रयागं तीर्थ नायकं ॥१॥

 ह्या श्लोकाप्रमाणे देवदर्शन इतकी आहेत.येथे गौरीचे लाखेचे दागिने चमत्कारिक मिळतात व त्याप्रमाणे सुती गालीचे सफेत रंगाचे फार नामी मिळतात.लोभकरावा हे विनंती.

 मुक्काम प्रयाग, तारीख ९ नवंबर १८७९. एडिटराचा स्नेही.

मथुरा, वृंदावन, गोकूळ.

 ज्ञानप्रकाशकर्ते यांस.

 वि०वि०. आपणाकडे श्री मथुरा क्षेत्रीच्या यात्रेची हकीकत लिहून पाठवितों, तिजला कृपा करून आपण आपल्या सुंदर पत्रों जागा द्याल अशी आशा बाळगतो.

 महाराज, अलाहाबादेस आम्ही रेल गाडीत स्वार झालो तो हात्रोज रस्त्याच्या स्टेशनावर ( त्या स्टेशनास नेटिव लोक मेंडूचे