या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाळच्या राजाने एक नंदिकेश्वराचे देऊळ बांधिले आहे. ह्या मंडपाच्या ईशान्येस महाजदीपासून सुमारे १५० याडीवर आदि विश्वेश्वराचे मंदीर आहे. हे देऊळ फार जुनाट आहे. त्याचा घु- मट अगदर्दी मोडकळीस आलेला आहे. ह्या देवळाच्या खालच्या भागाचा जीर्णोद्धार एक गणेशदास तंबाकूवाला यानें केला आहे. आदि विश्वेश्वराच्या देवळाच्या पूर्वेस थोड्याच अंतरावर काशी कर्वत नामें कूप आहे. ह्या कूपास वरून चालीप्रमाणे तोंड असून एक आंत उतरण्यास वाट आहे, परंतु ती आतां दर सोमवारी मात्र काही वेळ खुली असते. ह्याचे कारण असे सांगतात की, कांही वर्षांपूर्वी एका बैराग्याने येथे शिवार्चन करून प्रसिद्धपणे जळसमाधि घेतली. तेव्हां पासून सरकारने ती वाट अगदर्दी बुजवून टाकिली होती. पुढे तेथील पुजाऱ्याने अर्ज करून पुनः तशी गोष्ट न होऊं देण्याबद्दल मुचलका देऊन दर सोमवारी अमुक वेळ तो रस्ता यात्रेकन्याकरितां खुला ठेवावा असा हुकूम आणिला. ह्या भागांत पुःकळ देवळे ज्यांची कारागिरी उत्कृष्ट अशी आहेत.
 विश्वेश्वराच्या देवळापासून थोडेसे पुढे गेले म्हणजे शनीचे देऊळ लागते. तेथून पन्नास पाऊणशे कदम पुढे गेले म्हणजे अन्न- पूर्णेचें मंदीर लागते.ह्या देवीचे काम सर्वांस भोजन घालण्याचे आहे.येथे असा चमत्कार सांगतात की, कोणत्याही प्रका- रचा तडीतापडी अतिथी उपोषित राहात नाहीं. सवांस ह्या अन्न- पूर्णेच्या कृपेने भोजन मिळते. येथे भिजवून मूठ मूठ दाळ वाटण्याची चाल फार आहे.ह्याबद्दल कथा अशी सांगतात की, जेव्हां प्रथमतः श्री अन्नपूर्णा काशीवासास आली तेव्हां श्री० विश्वे- इवरानी तिला माझ्या नगरीत कोणी उपोषित राहू नये अशी तजवीज तं ठेव म्हणून सांगितले. तेव्हां इतक्या लोकांस अन पागी माझा एकटीच्याने कसे पुरवेल अशी काळजी ती करीत बसली. तेव्हां गंगेनें येऊन तिला सांगितले कीं, तूं सर्वांस मूठ मूठ दाळ दें म्हणजे मी त्यांस लोटा लोटा पाणी देईन.