या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अशा प्रकारें दोघीनों ही दोन कामे वाटून घेतली. ह्यामुळे येथे पुष्कळ श्रीमंताच्या बायका भिजलेली डाळ मूठ मूठ वाटितात. व ह्याच कारणास्तव एडिटरराव मला वाटते कीं, चैत्रांत हळदी कुंकाच्या समारंभास भिजविलेल्या डाळीने आपल्या तिकडे सुवा- सिनींच्या ओठ्या भरतात. येथे एकएकास इतकी डाळ मिळते की, दररोज ती वाळवून त्याने विकली म्हणजे त्याची आठ बारा आण्याची रोजी होते. असो, अन्नपूर्णेच्या कृपेचें फळ अन्नपूर्णेचें मंदीर सुमारे १५० वर्षांपूर्वी पुण्यांतील पेशव्यांपैकी एकानें बांधिले अशी खजर मिळते. ह्या देवीस जडितांचे अलंकार वगैरे पुष्कळ आहेत.
 ह्या देवळांत एका कोपन्यास सूर्यनारायणाची मूर्त स्थापिली आहे व दुसऱ्या कोपऱ्यास गौरी शंकराची मूर्त आहे. तिसन्या कोपन्यास हनुमान आणि चवथ्या कोपऱ्यास गणपती असे आहेत. अन्नपूर्णेच्या देवळावरून साक्षी विनायकास जाऊं लागले ह्मणजे धुंडिराज विनायक एके कोनाल्यांत बसविलेले आहेत त्यांचे दर्शन होते. साक्षी विनायकाचे देऊळ कोणी दक्षिणेकडील मराठ्यानें बांधले आहे असे समजतें.
 शनीच्या देवळाच्या दक्षिणेस शुक्रेश्वराचें देवालय आहे. सर्व यात्रा झाली म्हणजे साक्षी विनायकाचे दर्शन घेऊन त्यास साक्षी ठेवून नंतर काशींतून यात्रेकरू लोक जातात. लोभ असावा
हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.