या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
बंगाली टोला.

मुक्काम श्री वाराणसी

ता० जानेवारी १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
 वि० वि०. गेल्या पत्रों साक्षी विनायकापर्यंत आम्ही पला पोंच- विला. व आतां यात्रा समाप्त झाली. परंतु एडिटरराव आम्ही मध्येच खंड केला होता. आणि बंगाली टोला वगैरे प्रदेशाची माहिती लिहिण्याचे काम तसेच सोडून दिले होतें तें आतां लिहितों. त्याला कृपा करून आपल्या सुंदर पत्री जागा द्या.
 विश्वेश्वराच्या देवालयावरून साक्षीविनायकाच्या रस्त्याने दक्षिणे- स पुढे गेलें म्हणजे दशाश्वमेध महला लागतो. आणि त्याच्या दक्षिणेस बंगाली टोला आहे. ह्या भागास बंगाली टोला म्हण प्याचे कारण असे आहे की, येथे बंगाली लोकांचीच वस्ती विशेष आहे. बंगाल्यांतून जे शेट सावकार लोक वार्धक्य दशेत काशीवासास येत गेले ते बहुषा येथेच राहिले. त्यांच्या नंतर सरकारी कामाच्या संबंधाने अगर दुसऱ्या काही निमित्ताने जे दुसरे बंगाली लोक आले ते तेथेच राहूं लागले. आतां ह्या महल्यांत दुसरे कोणी लोक राहात नाहीत अगर काशीच्या दुसऱ्या महल्यां- तून बंगाली लोक राहात नाहीत असे जरी सर्वांशी वाचकानी समजूं नये तरी ह्याच प्रदेशांत बंगाली श्रीमान लोकांचा मुख्य भरणा आहे असे समजण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं. ह्या लोकांमध्ये इंग्रजी भाषेत प्रवीण पुष्कळ लोक आहेत. व ह्या क्षेत्री सुधा- रणुकेच्या ज्या गोष्टींचे विचार होतात त्यांच्यामध्ये हे लोक पुढारी असतात. ह्या बंगाली लोकांच्या बायकांस व मुल्स लिहितां वाचतां बरेंच येत असते. असे येथील सच् अ० सर्जन हे बंगाली आहेत ह्यांच्या भाषणावरून कळले. गरीब जे बंगाली लोक काशीवासास आले आहेत, ते सर्व काहींना कांहीं तरी व्यापार