या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१

करितात. इतर हिंदूंप्रमाणे भिक्षा मागणारे लोक ह्यांच्यामध्ये आढळत नाहीत. ह्यांच्यामध्ये जे ब्राम्हण आहेत ते सर्व शास्त्रा- ध्ययन करणारे आहेत. वेदाचें अध्ययन करणारे लोक अगदीच नाहीत म्हटले तरी चालेल. आपल्या तिकडे जसे पारशी लोक तसे इकडे हे बंगाली लोक आहेत.
 ह्या महल्यांतही देवालयांची गर्दी जशी विश्वेश्वरगंज महल्यांत आहे तशीच आहे. परंतु येथें मुख्य देव म्हटला म्हणजे केदारे- श्वर अथवा केदारनाथ हा आहे. हे स्थान फार जुनाट आहे असे सांगतात. केदारनाथाचे मंदीर गंगेच्या तटाकी आहे. त्याच्या पूर्वेस गंगाप्रवाहापर्यंत एक पसंत घाट बांधिला आहे. त्याला केदारघाट अशी संज्ञा आहे. हें केदारेश्वराचे मुख्य दे वालय असून शिवाय चार कोपन्यांस चार देवालये आहेत. ह्या देवालयाचा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. ह्या दरवाजाबाहेर दोन पाषाणाचे द्वारपाळ उभे आहेत. त्या प्रत्येकास चार चार हात आहेत. ह्या मूर्ति सुबक आहेत. ह्यांच्या चार हातांपैकी एकांत त्रिशूळ, दुसऱ्यांत दंड आणि तिसऱ्यांत कमल पुष्प अशी आयुर्वे आहेत. चवथा हात अभयसूचक मुद्रेप्रमाणे रिकामा आहे. केदारनाथाचे दर्शन नेमलेल्या वेळी होतें. मध्यंतरी मंदीर लावले. ले असते. मध्ये चौकांत वर सांगितलेली पांच देवालये असून चारी बाजूनी चार सोपे आहेत. त्यांत पुष्कळ देव आहेत.
 केदारेश्वराच्या मुख्य देवालयांत दररोज संध्याकाळी टांगले. ले पितळेचे ६७ कंदील लावितात. केदार ही जागा हिमाल- यांत आहे, आणि तेथील जो स्वामी तो केदारेश्वर. हिमाल- यांत बद्रिनारायणाचे आलीकडे बद्रिकेदाराचें स्थान आहे. कोणी ब्राम्हण केदार नांवाचा वसिष्ट ऋषीबरोबर हिमालयांत बद्रिकेदारा- स गेला. आणि तेथे त्याने मोठें तप केले. पुढे तो मरण पावला. तेव्हां शंकरानी आपल्या ज्योतीत मिळवून घेतला. पुढे तो ब्राम्हण वसिष्ट ऋषीच्या स्वप्नांत गेला आणि म्हणाला की,