या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नंदीही त्याच पाषाणाचा आहे. देवीचे देवळांत चोहो बाजूनी मोठाले सोपे आहेत, त्यांतून बैरागी वगैरे लोक राहतात. ह्यापैकी मागल्या सोप्यावर बागेश्वरीचे स्थान आहे. ह्या देवीचा मुखव टा सोन्याचा आहे. ह्या बागेश्वरीपासून थोड्याच अंतरावर एक त्रिभित्स पुतळी आहे. ह्या देवळाचा सभामंडप एके पलटणी- तील सुभेदाराने थोड्या वर्षांपूर्वी बांधिला आहे. ह्या देवळांत एक मोठी घांट आहे. ती मिरजापुरास सुमारें ४० वर्षांपूर्वी एक गोरा माजिस्ट होता त्याने दिली असे सांगतात.
 ह्या देवालयाचे काम फारच नक्षीदार आहे. कमानी आंती- ल आणि बाहेरील अशा दुहेरी आहेत. बाहेरील कमानीवरून पक्षावर बसलेले आणि हातांत विणा घेतलेले असे दगडी पुतळे बसविलेले आहेत. आणि आंतील कमानीवरून दुर्गा देवीच्या मूर्ति बसावल्या आहेत. देवळाच्या पुढील अंगास बाहेरील कमानीवर जे पुतळे आहेत त्यांची वाहने सिंह आहेत.
 ह्या देवळाच्या बाहेरच्या अंगास एक मोठा तलाव आहे. हा तलाव फारच मोठा आहे. परंतु ह्याचे विशेष महात्म्य नाहीं. तत्रापि त्या महल्यांतील लोकांस त्यांतील पाण्याचा पुष्कळ उपयोग पडतो.
 ह्या दुर्गाकुंडापासून गंगेच्या वाटेवर थोड्याच अंतरावर पूर्वेस कुरुक्षेत्र तलाव आहे. हा तलाव चोही आंगांनी बांधून काढला आहे.हा ज्या राणीने दुर्गेचें देवालय बांधिले त्याच भवानी बाईनें बांधिला असे सांगतात. सूर्यग्रहण पर्वणींत ह्या तलावांती- ल स्नानाचे मोठे फल आहे.
 कुरुक्षेत्र तलावाच्या वायव्येस थोड्या अंतरावर लोलारिक कुवा आहे. हा कुरा जोडकुवा आहे. ह्मणजे खालीं पाण्याचा तळ एक असून वर दोन तोडे दोन विहिरीसारखी आहेत. ह्या दोन्ही तोंडांपैकी पूर्वेकडील तोंड वाटोळे आहे. आणि पश्चिमेकडील तोंड समान्तरभुज चौकोनाकार आहे. ह्या चौकोनी तोंडास तीन