या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१

वेदव्यासाचे देऊळ आहे. किल्ला गंगातटाकीच आहे. त्यामुळे गंगेच्या तटावरून चढून वेदव्यासाच्या देवळांत रस्ता जातो. हा घाट चढू लागले म्हणजे डाव्या हातास संगमरवरी दगडाची गंगेची मूर्त कोनाड्यांत बसविलेली आहे तिचें दर्शन होतें. ही मूर्ति चतुर्भुज आहे त्यापैकी दोन हस्त वरद आणि अभय आहेत. ति- सन्या हातांत कमलपुष्प व चवथ्या हातांत पानपात्र अशी आहेत. हा घाट चढून गेलें म्हणजे वर किल्याच्या भिंतीसच वेदव्यासाच्या देवळाचा दरवाजा लागतो. त्यांतून आंत गेल्यावर एक महादेवाचे मंदीर दृष्टीस पडतें. हेच काय तें वेदव्यासाचें देऊळ.  पंचक्रोशीची यात्रा अवश्य केली पाहिजे. अशी ह्मण आहे कीं, घडे काशी पण न घडे पंचक्रोशी. पंचक्रोशीची यात्रा म्हणजे प्रदक्षिणेची यात्रा आहे. ह्या पंचक्रोशीचा रस्ता राणी भवानी बाई साहेब यानी सुमारे १०० वर्षांपूर्वी नीट बांधिला. व हल्लीही त्याची दुरुस्ती बरीच आहे. ही प्रदक्षिणा पांच पन्नास यात्रेकरी एकत्र मिळून करितात. वाटेनें रावापासून रंकापावेतो अनवाणी चालावें लागतें. पान सुपारी खातां कामानये. सोवळें असावें. आ- पल्या डाव्या अंगास थुंकी वगैरे टाकावी, असे अनेक नियम पाळावे लागतात.ही यात्रा क्षेत्रस्याने संवत्सरांतून दोनदां क. रावी. व यात्रेकऱ्याने तर एकदां केलीच पाहिजे असे सांगितले आहे. जे कांहीं पातक काशी क्षेत्रों घडते त्या सगळ्याचें मोचन पंचक्रोशीच्या यात्रेने होतें.
 मणिकर्णिका घाटापासून पंचक्रोशीच्या प्रदक्षिणेस आरंभ होतो. पाहिल्याने यात्रेकरी मणिकर्णिकेचे दर्शन घेऊन निघाला म्हणजे गंगेच्या कांठाकांठानें आशी संगमावर जातो. आणि जवळच्या जगन्नाथाचे दर्शन घेऊन पहिला मुक्काम बहुशा खांडव्यास करि- तो. हे गांव प्रदक्षिणेच्या वाटेवर मणिकर्णिकेपासून सुमारे सहा मैल आहे. दुसरा मुक्काम तेथून पुढे सहा मैलांवर धूपचंडीस