या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असून मध्ये वाराणशी क्षेत्र होते. ह्यामुळे तिकडून शहरचा बचाव करून बंडवाल्याशों सरकारास लढतां येईना. तेव्हां जुन्या किल्ल्याची जागा शोधून काढून तिच्या शेजारी मोर्चे बांधले आणि लहानशी गढी तयार केली. आणि वरुणेच्या कांठचीं चा- री देवालये बंद केलीं. ह्या गढींत कांही इमारती आहेत व त्या पाहण्यासारख्या आहेत असे कळते, परंतु त्याला सरकारी हुकूम लागतो सवव त्या आमच्या दृष्टीस पडल्या नाहीत.
 वरुणासंगमापासून दक्षिणेकडे नावेत बसून आले म्हणजे राज- घाट लागतो. येथे भागीरथी उतरून पैलपार जाण्यास नावांचा पूल आहे.राज घाटाच्या दक्षिणेस प्रल्हादघाट आहे.
 राजघाटावरून उत्तरेकडच्या रस्त्याने सुमारे पाऊण मैल लांब गेलें म्हणजे कपिलमोचन तलाव लागतो. ह्याला भैरव तलावही म्हणतात. हा तलाव चोहीकडून पक्या दगडांनी बांधिलेला आहे. ह्या तलावाच्या उत्तरेस थोड्या अंतरावर उंचट जमीन आहे. तेथे एक दगडी चउत्रा बांधिला आहे. ह्या चउत्र्यावर सुमारे आठ फूट उंच आणि तीन फूट घेराचा एक दगडी खांब उभा आहे. ह्या खांबास लाटही संज्ञा आहे. ही लाट शिवाची आहे. हल्लीं जी लाट येथे उभी आहे ती मुळची लाट नाहीं. मुळची लाट सुमारे ६० वर्षांपूर्वी हिंदू आणि मुसलमान ह्यांच्यामध्ये तंटा झाला त्यांत फुटली गेली. तरी ती सगळी मोडली गेली नाहीं, कारण हल्लीं जितकी उभी आहे तितका भाग मुळच्या लाटेचा अवशेष आहे असेंही कांही लोक सांगतात.ह्या अवशेषास हल्ली तांब्याच्या पत्र्याने मढविले आहे.
 ही लाट पूर्वी देवळांत होती, परंतु औरंगजेब पादशहाने तें देऊळ मोडून त्या जागी एक महजीद बांधली आणि लाट उघ- डीच टाकिली. पुढे ती दुसऱ्या कज्यांत मुसलमानांनी फोडली. कोणी असे सांगतात की, हिंदु आणि मुसलमानांच्या तंटयाच्या वेळी ही लाट उपटून गंगेत नेऊन टाकिली होती.