या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६

 साठ वर्षांच्या पूर्वी दंगा झाला, त्याची हकीकत अशी सांगतात की, शिमग्याचा सण आणि मोहोरमचा सण असे दोन्ही सण एकदम आले.हिंदू आणि मुसलमान लोकांचे मेळे दिवसा व रात्री गांवांतून फिरूं लागले. असे एक दोन दिवस झाल्यावर रस्त्यांत एके ठिकाणी दोन्ही ज्ञातीच्या मेळ्यांची गांठ पडली. तेव्हां कोणी कोणास बाजू देईना. मग मोठी मारामारी झाली. तीत मुसलमान लोक हटले.हा आपला पराजय झाला ह्याबद्दल सूड उगवावा म्हणून मुसलमानांनी ह्या लाटेला उपटून टाकिले, मग हिंदु लोकांस मोठाच क्रोध आला आणि त्यांनी महाजेदी पाडण्यास आरंभ केला. एक तर पाडून जमी- नदोस्त केली, आणि दुसरी पाडणार तो सरकारी लष्कर येऊन बंदोबस्त केला. पूर्वी येथें दरसाल मेळा भरत असे, परंतु हल्लीं ती चाल अगदर्दी बंद झाली आहे.कपिलमोचन तलावावरून वरुणासंगमाकडे रस्ता जातो, परंतु एडिटर बाबा रस्ता असा खरा- ब आहे की, तांग्यास लावलेला घोडा देखील खांद्यावर घेऊन जा- ग्याचा समय येतो. ही गोष्ट कपिलमोचनापासून वरुणासंगमा- कडे जो रस्ता जातो त्या सगळ्याची नव्हे, परंतु वरुणा नदीस एक मातीचा बांध घालून त्यावर लाकडे टाकून एक पूल केला आहे त्याची सांगतो बरें. आतां ह्या पुलावरून जाण्याबद्दल टोल द्यावा लागतो, परंतु गौरकाय लोक त्या वाटेने बिलकूल येत नाहीत म्हटले तरी चालेल म्हणून पूल जात्याचा आणि टोल दडपायाचा. असो हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.