या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८७
गयेची यात्रा आणि तेथून परत.

ज्ञानप्रकाशकर्ते यांसः -
 वि० वि०. आपणाकडे आज पावेतों श्री वाराणशी क्षेत्राची हकीकत थोडी थोडी लिहून पाठविली, तिला तुझी आपल्या सुंदर पत्र जागा देत गेलां हे उपकार आपले मजवर मोठे झाले. हल्ली आली गयेकडील माहिती लिहितों, तिला आपल्या सुंदर पत्री जागा द्यावी इतकी आमची प्रार्थना आहे.
 वाराणशीहून निघालें म्हणजे सुमारें ७ मैलांवर मोगल सराईचें स्टेशन लागतें. ह्या स्टेशनाजवळ आले म्हणजे कलकत्याहून दिल्लीस जी आगगाडीची थोरली सडक गेली आहे ती लागते. तेथे गाड्या बदलतात. त्यांतून डाक गाडींत बसलें म्हणजे सुमारें ६ तासांत मनुष्य पाटणा शहरी पोंचतें, ह्मणजे काशीहून पाटणा शहर सरासरी ६० कोस लांब पडते. ह्याच्या जवळच कोसा दीड कोसावर वाकीपूरचे स्टेशन आहे तेथे उतारू लोक गयेस जाण्याकरितां उतरतात.
 पाटणास हिमालयाच्या पायथ्याशी जो तेराई प्रांत आहे तिक डील हत्ती पुष्कळ विकावयास येतात. तेराईच्या जंगलांत हत्ती फारच चमत्कारिक रीतीने धरतात. पानवथ्यावर हत्ती पाणी पिण्यास येतात आणि यथास्थित रीत्या तृषेची शांति झाली ह्मणजे मग बाळ यथाशक्ति क्रीडा करूं लागतें. जंगलांत लहान लहान झाडे असतील तीं उपटून टाकतें. हत्तीण असली तर तिला डो- हांत घेऊन जाण्याचा यत्न करतें. असा त्या जनावराचा नित्य संप्रदाय असतो. ही गोष्ट तिकडील सर्व लोकांस जाहिर आहे. ह्या करितां हत्ती धरावयाचा झाला म्हणजे अशा पानवथ्याजवळ माहुद लोक सुमारे २५ पासून ४० फूट लांब आणि १५ फूट रुंद असा लकड कोट करतात. त्यास एक दरवाजा असून भोवताली सुमारे १० फूट खोलीचा खंदक खोदतात. दरवाजा मात्र एक