या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९

तात आणि त्यास झाडाला बांधून टाकितात. असा सर्वांगाने जख- डलेला त्याला पांच सहा दिवस जरूर असल्यास ज्यास्त दिवस उपोषित ठेवितात. मग काय विचारतां एडिटर बाबा, स- हजच तो सांगितले काम ऐकूं लागतो.
 असो इकडे बाकेपुराहून गया क्षेत्र ५६ मैल दक्षिणेस आहे. गयेस जाण्याला सडक बरीच आहे.
 बाकेपुरास म्याने, एके, गाड्या वगैरे सर्व प्रकारची वाहने मिळतात. ह्या वाहनांतून पैशाच्या मानाप्रमाणे जलद अगर उशि- रानें मनुष्य गयेस पोहोचतो.
 बापुरापासून सुमारे ७ मैलावर पुनःपुनः नदी लागते. तेथें सक्षीर श्राद्ध केले पाहिजे. ह्या नदीस पुनःपुनः ह्मणण्याचें कारण असे दिसतें कीं, ती गयेस पोहोचे पावेतो दहा बारा वेळां उतरावी लागते.
 गया हे शहर बरेंच मोठे आहे, परंतु उदास आहे. येथे फलगु नदी पालथी वाहात आहे. ह्या नदीस डब्रे खणून पाणी काढावें लागतें. एकंदर गयावर्जन यथाशास्त्र करावयाचे म्हटले म्हणजे ४५ दिवस लागतात. परंतु आतां तितकें करणारे फार थोडे. दक्षिणी लोक तर तितकें करीत नाहीत म्हटले तरी चालेल, आतां फार झाले तर अकरा दिवसांत गयावर्जन संपावतात. परंतु पुष्कळ लोक झटले ह्मणजे एकोतिष्ठांच करितात. एकोतिष्ठेि झटली म्हणजे ३ दिवस तीन श्राद्धे एक फलगु श्राद्ध दुसरे बटश्राद्ध आणि तिसरें विष्णुश्राद्ध करितात. त्यास तीन दिवस लागतात. चवथे दिवशी शुद्धश्राद्ध करून संध्या करितात. संध्या म्हणजे प्रातःसंध्या, माध्यानसंध्या, आणि सायंसंध्या, अशा नांवांची तीन कुंडे आहेत त्यांत सकाळी, दोन प्रहरीं आणि संध्याकाळी स्नानें करून विशेष संकल्पपूर्वक तिन्ही संध्या करितात.ह्या संध्या करण्याचे तात्पर्य असे आहे की, ब्राम्हणाच्या मौजिबंधनापा-