या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६ )

पासून सर्व पृथ्वीवर गाजत असल्याचा उल्लेख वर केलाच आहे. याचप्रमाणे बंदुका, तरवारी व दुसरी हत्यारे तयार करण्याची कला, खोदीव काम, नकशीचे काम व मिन्याचे काम करण्याचे हस्तकौशल्य,पेपिआरम्याचीचे (कागदाच्या कुट्टयाचे )काम, येथे तयार होणाच्या कागदांची सफाई, व दुसरे कारागिरीचे जिन्नस पाहिले असतां, हा देश हस्तकौशल्याचे काम दुस-या कोणत्याही देशास मागे सरणार नाहीं असेच ह्मणावे लागते. या सर्व गोष्टींवरून प्राचीनकाली ग्रीस व रोम में देश जसे युरोप खंडांत विद्या व कला यांची मुख्य स्थळे होती तसा काश्मीर देश आपल्या खंडांत सर्व विद्या व कला यांचा आद्यस्थान होता.
 शेवटीं प्राचीन किंवा अर्वाचीन इतिहाससंबंधाने विचार केला असतांही या देशाची योग्यता आपणांस दुसऱ्या कित्येक देशांपेक्षां विशेष मानिली पाहिजे. कारण, येथील पहिला राजा जो गोनंद (गोनर्द ) तो श्रीकृष्णाचा. समकालीन असून या उभयतांत युद्धप्रसंग झाल्याची : कथा राजतरंगिणींत दिली आहे. ती पुढे इतिहास प्रकरणांत येईल. अलीकडच्या कालांतही कित्येक मोंगल बादशहांचा हा देश मोठा आवडता असून उष्णकाळांत ते आपल्या प्रियांसह या भूस्वर्गी जाऊन मोठ्या आनंदाने विलाससुख घेत राहत. जहांगिर बादशहास तर हा दश इतका आवडता असे की, “माझे सर्व राज्य गेले. तरी हरकत नाही, पण काश्मीर देश मात्र मी कधी सोडणार नाही, असे तो ह्मणत असे, असे ए० बुईलसन् आपल्या ग्रंथांत लिहितो. त्याची प्रिया ज़ी नूरजहान् तिचा हा देश किती आवडत होता, याची