पान:काश्मीर वर्णन.pdf/151

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १४६ ) बापलेकाच्या कारकीर्दीत लिहिण्यासारख्या कांहीं विशेष गोष्टी घडल्या नाहीत. जलौकषा नंतर तुंजीन हा गादीवर बसला. याच्या राणीचें नांव वाक्पुष्टा होतें. ही महापतिव्रता होती. हा राजा मोठा पराक्रमी, नीतिमान्, धार्मिक व विद्वान् होता. यानें केलेले स्फुट श्लोक आढळतात म्हणून समजतें. यानें अति उत्तम रीतीनें राज्य केलें म्हणून व्यासाच्या शिष्यानें याजवर एक नाटक लिहून तें करून दाखविलें. चंद्रक नांवाचा एक मोठा कवि व नाटककार याचे पदरी होता, पण त्याचे ग्रंथ सांप्रत उपलब्ध नाहीत. या राजानें याच्या वेळी तुंगेश्वर नांवाचें शिवालय बांधिलें होतें. एक मोठा भयंकर दुष्काळ पडला होता; पण राजा, झटून प्रजेच्या अखेर राणीच्या त्याची राणी व मंत्री यांनी अतिशय प्राणाचें रक्षण करण्याचा यत्न केला. प्रभावानें तो दुष्काळ बंद झाला. या दुष्काळाचें सुरेख वर्णन आमचे मित्र रा०रा० वासुदेव वामन शास्त्री खरे यांनी कवितारूपाने लिहिले आहे. यानें छत्तीस वर्षे राज्य करून स्वर्गारोहण केलें. तेव्हां अनाथ लोकां- करितां त्याच्या राणीनें जेथें अन्नसत्र घातलें होतें, त्या स्थलीं ती राजाबरोबर सति गेली. तें सत्र अद्यापि चालू आहे म्हणून समजतें. तसें असल्यास एवढें जुनें सत्र | आपल्या देशांत तर कोठें असेल असे वाटत नाहीं. यास पुत्र नव्हता, याचें कारण ब्रम्हदेवास असें वाटलें की, या दंपत्यास पुत्ररत्न दिलें असतां तें यांच्यापेक्षां अधिक चांगले कोठून निपजणार, असें कल्हणकवि म्हणतात. असो. याच्या मागून विजय नांवाचा राजा