या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


________________

( १४७ ) झाला. हा दुस-या कुलांतील होता. याने आठ वर्षे राज्य केले. नंतर । | जयेंद्र गादीवर बसला. हा आजानुबाहु असून पृथुराजासारखा पराक्रमी व मोठा शूर होता. साधिपति नांवाचा त्याचा प्रधान होता. तो सर्व गुण संपन्न होता म्हणून राजाचा त्याजवर मोठा भरंवसा व प्रेम होते. ही गोष्ट राजाजवळ राहणा-या अन्य लोकांस सहन न होऊन त्यांतील एकाने राजाजवळ अशी चुगली केली की, प्रधानाच्या मनांत आपली गादी बळकाविण्याचे आहे. ही गोष्ट ऐकून राजाची प्रधानावर इतराजी झाली आणि त्याने त्यास दहा वर्षे कैदेत ठेवून अखेर त्यास सुळी दिले. ईशान नांवाचा प्रधानाचा गुरु होता. त्यास हें वर्तमान कळून फार वाईट वाटले. मंत्री संधिमति याच्या मस्तकावर विधात्याने असे लिहून ठेविले होते की, तो सुळी गेल्यावर दहा वर्षे राज्य करील. त्या लेखाप्रमाणे योगिनी नांवाच्या वनदेवतांनी त्याचे प्रेत घेऊन ते सजीव केले; कारण, तो त्यांस भोग देण्यास पाहिजे होता. मध्यंतरी जयेंद्र राजा मरण पावला आणि कांहीं काळ गादी रिकामी होती. पुढे संधिमति हा राज्यावर येऊन बसला. त्याने आर्यराज असे नांव धारण केले. हा मोठा शिवभक्त होता. तो दररोज एक हजार शिवलिंगांची स्थापना करून त्यांची पूजा करी. त्यांतील लिंगे अद्यापि कोठे कोठे क्वचित् दृष्टीस पडतात म्हणून सांगतात. याच्या मागून पुनः गोनर्द घराण्यांतील । मेघवाहन गादीवर बसला. हा बौद्ध धर्माचा मोठा वाली होता. याने कांहीं गांव वसविले आणि