पान:काश्मीर वर्णन.pdf/153

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १४८ )

विहार स्थापिलें. यास पुष्कळ वायका होत्या. त्यांत यूकदेवी, इंद्रदेवी व अमृतप्रभा ह्या तीन मुख्य होत्या. या तिहींनीं आपआपल्या नांवाचा एकेक विहार स्थापिला. यूकदेवीस बौद्ध सन्याशांची ( श्रवणांची ) सेवा कर- ण्यास नेमिलें होतें. याच्या वेळीं एक भिल्ल आपला मुलगा बळी देण्यास तयार झाला असतां राजा त्यास आडवा येऊन ह्मणाला, तुझ्या मुलाबद्दल मी आपलें शीर देवीस अर्पण करितों. हें त्यांचें उदार भाषण ऐकून देवी त्यास ह्मणते, तूं व मिहिरकुल एकाच कुलांत जन्मला असून तूं अहिंसा धर्मं आणि त्यानें तर तीन कोट मनुष्यें मारिली ही गोष्ट फारच विचित्र आहे. याच्या पूर्वजांनीं वरुणाचें छत्र हिरावून आणलें होतें. तें वरुण येऊन त्यानें मागि- तल्यावरून राजानें त्यास परत दिलें. तेव्हां तो मोठा प्रसन्न होऊन त्यानें राजास समुद्र तरून जाण्याची शक्ति दिली. तेव्हां राजा सैन्यासह लंकेस गेला. त्या वेळी तेथें विभिषण राज्य करीत होता. त्यानें मेघवाहनास पुष्कळ रत्नें व छत्रचामरें दिलीं. तो त्या द्वीपांतील लोकांस हिंसा न करण्याचा उपदेश करून परत आला. याच्या राज्यांत सिंह, व्याघ्र व ससाणा हे देखील हिंसा करीत नसत. •असा तो धार्मिक व नीतिमान् होता. त्यानें ३४ वर्षे राज्य केलें. नंतर मेघवाहनाचा नातू

श्रेष्ठसेन गादीवर बसला.

पुत्र हिरण्य हा त्याच्या मागून त्याचा गादीवर बसला. त्यानें आपला धाकटा बंधु तोरमाण याला युवराज केला. एके वेळी तोरमाणानें आपल्या शिक्कचाची दिनार नांवाचीं नाणीं पाडिलीं. ती पाहून राजा हिरण्य याला मोठा राग