पान:काश्मीर वर्णन.pdf/191

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८६ )

आपण पुनः गादीवर बसला. याप्रमाणें चुलता चार वेळां व पुतण्या तीन वेळां आळीपाळीनें राज्य- भ्रष्ट होऊन पुनः पुनः गादीवर बसले. महंमद राज्य करीत असतां हुमायून बादशहानें या देशावर एकवार स्वारी केली पण त्यास मागें परतावें लागलें. यांच्या मागून नाझुकशहा, मिरजाहैदरहुमायून हे अनुक्रमें गादीवर बसले. यांच्या वेळींही देशांत शांतता मुळींच नसून दंगे मात्र एकसारखे चालू होते. ही संधि पाहून अकबर बादशहानें आपला सरदार कासि मखान यास या देशावर स्वारी करण्यास पाठविलें. त्याप्रमाणें त्यानें जाऊन तो देश इ० स० १९८७ मध्यें काबीज केला. तो १७५३ पर्यंत मोंगल राज्याखालीं होता. अकबर या देशीं तीन वेळा गेला होता. पण त्यानें येथील विशेष सुखोपभोग घेतल्याचा लेख मिळत नाहीं. एके स्वारीत स्पेन देशाचे जेविअरगोएज हे त्याजबरोबर होते. तो सुखोपभोग घेण्याचे काम त्याचा विलासी व गुलहौसी पुत्र जहांगीर व त्याची प्रिया नूरजहान यांनीं केलें. तो उष्ण कालांत बहु- तकरून दरसाल आपल्या प्रियेत बरोबर घेऊन या भूस्वर्गी जात असे असा लेख सांपडतो. या दंपत्यास हा देश किती आवडता होता, याचें व तिच्याकरितां बादशहानें तेथें तयार केलेल्या कितीएक रम्य स्थलांचें वर्णन आह्मीं पूर्वी दिलेच आहे. या देशास तो खरो- खरीचा भूस्वर्ग मानीत असून आपला अंतकालही येथेंच व्हावा अशी त्याची इच्छा होती.त्याप्रमाणें तो त्या देशांत असतां पुंच जहागिरींतील बारांगला नांवाच्या