या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८ )


होऊन पाहिजे ती चाकरी करण्यास तयार असतात. अशा प्रकारे मार्गक्रमण करीत असतां सकाळचे अकरा वाजता आह्मी सोपूर गांवाजवळ आलों . याचें जुनें नांव कंबूर होतें. हा गांव नदीच्या दोहों तिरांवर वसलेला असून त्यास जोडणारा येथे एक पूल आहे. गुलमर्ग (पुष्पवाटिका) व लोलाबदरी येथे जाण्यास येथूनच मार्ग फुटतात. सोपूर येथे नदीतीरीं उतरून भोजन करून घेतलें. नंतर पुन्हा किस्तीत बसलो. केव्हां पुस्तक वाचण्यांत, केव्हां नदीतीरची वनश्री पाहण्यांत व केव्हां हांजीशी गप्पा मारण्यांत आह्मी वेळ घालवीत असू. याप्रमाणे जलमार्ग कंठीत असतां पश्चिम दिशेने लालभडक शालू परिधान केला. त्याच्या तेजाने ती सर्व दिशा आरक्त दिसू लागली. तेव्हां हांजीने होडी नदीच्या कांठीं उभी केली. जवळ गांव दृष्टीस पडले नाहीं. आजची रात्रही आह्मीं होडींतच काढिली. आमच्या शेजारीं आमच्या सारखे प्रवासी व व्यापारी लोक यांच्या होड्या येऊन उभ्या राहिल्या आणि या रात्री आह्मांस त्यांचीच सोबत होती.
 दुसरे दिवशी पहाटे दोन तास रात्र घेऊन हांजीनें किस्ती चालू केली. सूर्योदयाचे वेळीं बंगल्याचा पडदा वर करून पाहिलें तों चोंहोंकडे जलमय असून कांहीं लाटा मारीत असलेल्या दृष्टीस पडल्या. आमची होडी समुद्रांत काढून यावी असा विचार मनांत येऊन हांजीस पुसले, तेव्हां आह्मी दयांत आलो आहों झणन त्याने सांगितले. तेव्हां वितस्ता नदी वलर सरोवरांत येऊन बाहेर पडते व यांत भयंकर तुफाने होतात, असे आह्मा वाचलें