या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३७ )

पडत असे तितके अलिकडे पडत नाहीं असें ह्मणतात. कप्तान मांटगामरी नांवाचे रायल इंजिनियर हे पिरपंजाल पर्वताच्या शिखरावर सव्र्हेचे काम करत असतां तुफान किंवा वादळ नसून विद्युत् मात्र इतकी खडतर होती की आपले थिओडलाइट ( कोन मापण्याचे यंत्र ) च्या बचावाकरितां तिचा वाहक आपल्या बरोबर न्यावा लागे असे ते लिहितात. आकाश निरभ्र असून हवा स्वच्छ असते तेव्हा या पर्वतांवरून १३५ मैल अंतरावरचे लाहोर येथील मनोरे चांगले दृष्टीस पडतात.

नद्या.

 या भूस्वर्गात मुख्य नदी झेलम ही होय. करिता हिनविषयी प्रथम थोडेसे वर्णन देतो. या नदीस संस्कतांत वितस्ता असे नांव आहे. वेदांतही हिचे नांव आलेले आहे. राजतरंगिणींत हेच नाव जागोजाग येते, काश्मीरांतील पंडित लोकांतही हेच नांव आज मितीस चालू आहे. शिकंदर बादशहाने या देशावर स्वारी केली, तिचे वर्णनांत हिला हिडॉसपिस असे झटले आहे. यवन लोक हिला बिहत असे ह्मणतात. हिचे पाणी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ व अमृतासारखे मधुर असल्यामुळे हिला स्वर्गनदी असेही क्वचित् ह्मटले आहे. तीन नद्या एकत्र होऊन ही नदी बनते. हिचा उगम इशान्येकडील पर्वतांत वरनाग नांवाचा एक झरा आहे तेथे होतो. येथून ती वायव्य गामिनी होऊन सर्व दन्यास दुभागते व शहाबाद, इसलामबाद व पांपूर या गांवांवरून श्रीनगरांतून वुलर नांवाच्या सरो
 4