या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंताचें चरित्र. १ विषयाचे अभिनंदन. ... _ 'कवि सृष्टीचा अलंकार । कवि लक्ष्मीचा शृंगार । सकळ सिद्धींचा निर्धार । ते हे कवि ॥ १ ॥ कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचे भूषण । नानासुखांचे संरक्षण । ते हे कवी ॥ २ ॥ नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवीश्वरवीण तें नाहीं । कवीपासून सर्वही । सर्वज्ञता ॥३॥ नसता कवींचा व्यापार । तरी कैंचा असता जगदुद्धार । ह्मणोनि कवि हे आधार । सकळ सृष्टीसी. ॥ ४ ॥' (दासबोध १.७) श्रीसमर्थ रामदासस्वामी ह्यांनी कवीविषयीं जें वर मटलें आहे तें अक्षरश; खरे आहे. कोणत्याही राष्ट्राचा अभ्युदय होण्यास ज्या सत्पुरुषांचे परिश्रम कारणीभूत होतात त्यांत कवींची गणना प्रमुखत्वाने केली पाहिजे. कवि हे राष्ट्राचे आत्मे होत. ते 'शब्दसृष्टीचे ईश्वर', 'कल्पनेचे कल्पतरु', 'चातुर्याच्या मूर्ति', 'बुद्धीचे वैरागर', 'सरस्वतीचे निजस्थान', 'अमृताचे मेघ', 'सुखाचे सरोवर', व 'स्वधर्माचे आश्रय' असल्यामुळे राष्ट्रांत श्रेष्ठ प्रतीचे धर्मविचार जागृत करून धर्माचा पाया बळकट करणे, त्यांतील उपयुक्त संस्थांविषयी योग्य अभिमान वाढवून त्या चिरस्थायी करणे, त्यांतील थोर पुरुषांविषयी आदर उत्पन्न करवून राष्ट्रीय सद्गुणांचा प्रसार करणे इत्यादि राष्ट्रोन्नतीस अत्यंत अवश्यक अशी महत्कार्य शांतपणे करण्यास कविच समर्थ होतात. अशांच्या मालिकेत महाराष्ट्रभाषेचा कंठमणि, व महाराष्ट्रकवितावधूचा प्राणेश्वर प्रसिद्ध रामभक्त मोरोपंत यांची गणना होते. ह्मणूत त्यांचे संक्षिप्त चरित्र केकावलीच्या रसिक वाचकांकरितां येथे सादर केले आहे. २ कुळाची थोडीशी पूर्वपीठिका वगैरे. ___ 'उपजला तरि तोचि मला गमे, । कुलसमुन्नति ज्यास्तव घे, रमे.' ॥ (वामन.) कोंकणांत रत्नागिरी जिल्ह्यांत राजापुर तालुक्यांत सौंदळ या नावाचे एक लहानसें गांव आहे. तेंच या कविश्रेष्ठाच्या पूर्वजांचे मूळ ठिकाण. त्यांचे उपनांव पराडकर. पराडकर हे जामदग्न्य गोत्री कन्हाडे ब्राह्मण. कसबें सौंदळ येथे पंतांचे आजे डांगेपतकी, हाणले जमिनीवरील व समुद्रावरील जकात घेण्याचे काम करित. पूर्वी हे गांव चांगले भरभराटीस आले होते. परंतु कालचक्रास अनुसरून आजला ते अगदी निकृष्टस्थितींत आले आहे. पराडकरांचा जमीनजुमला सध्यां तेथें कांहीं नसून भालेराव वाडींत शंकराच्या देवळाजवळ त्यांच्या वाड्याचा पडका चौथरा मात्र आजला दृष्टीस पडतो. सध्या ह्या गांवांत ब्राह्मणाचे एकच घर असून ते पराडकरांचे कुलोपाध्याय वरेकर भटजी यांचे आहे. याच गांवीं पंतांचे तीर्थरूप रामचंद्रपंत पराडकर हे लहानाचे मोठे झाले. याच सुमारास कोंकणांतील पुष्कळ मंडळी मराठी राज्यांत रोजगार पहाण्यासाठी कोंकण सोडून घाटावर गेली. रामाजी पंतही आपल्या वडिलोपार्जित वृत्तीस कंटाळून ह्मणा किंवा इतरांप्रमाणे मराठी राज्यांत आपल्या नशीबाची परीक्षा पहाण्याकरितां ह्मणून ह्मणा आपला गांव सोडन आपल्या