या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. 'पिता खळ, परंतु ती गुणवती सती चांगली; 35 धरी.' ॥ (कृष्णविजय ५६.) आपण दुष्कृति यास्तव प्रभूनें स्तुतिरूप कवितावधूचा स्वीकार करणे हा असंभवनीय अर्थ होय. पण नमस्कृतिपुरःसर अर्पणाने त्या असंभवनीय अर्थाचा संभव केला आहे म्हणून या केकेंत अर्थश्लेष नामक गुण आहे. याचे लक्षण:'श्लेषो विघटमानार्थघटमानत्ववर्णनम्' [चंद्रालोकः १, चतुर्थमयूख.] जेव्हां असंभावित अशा अर्थाची संभावना युक्तिद्वारा अथवा कांही निमित्त योजून दाखविली असते तेव्हां अर्थश्लेष नामक गुण होतो. १. 'पिता खळ, परंतु ती सती [सत्यभामा] गुणवती चांगली, म्हणोनि मज [तिला] आपुल्या भजनिं लावणे लागली' [असें, हे देवा! तुम्ही म्हणाल, तरि जो दांडगा भांडगा त्रिनव रात्र अहर्निशिंहि तुम्हासवें भांडला, तत्सुता कशि? असा अन्वय. 'सत्राजिताचे उदाहरण तूं दाखविलेंस खरे पण ती गोष्ट निराळी होती; सत्राजित जरी दुष्ट होता तरी त्याची मुलगी सत्यभामा गुणवती होती म्हणून मी तिच्या गुणांवरून तिचा स्वीकार केला' असें कदाचित् आपण म्हणाल अशी शंका घेऊन कवि ह्या केकेंत तिचे निवारण करितात. पिता सत्राजित. २. दुष्ट, अपराधी. सत्राजिताच्या अपराधाचे शासन त्याच्या सद्गुणी कन्येस भोगावयास लावणे हे अन्यायाचे होईल म्हणून मी तिचा त्याग न करितां भार्यात्वाने तिचा स्वीकार केला. ईश्वरविषयक कल्पना:पित्याच्या अपराधाबद्दल त्याच्या संततीस शिक्षा करणे कधीही न्यायाचे होणार नाही. हा कृष्णाचा कवीने दर्शविलेला अभिप्राय किती तरी यथार्थ आहे ! 'जे माझा द्वेष करितात त्यांच्या पापांचें शासन मी त्यांनाच करितों असें नाही तर त्यांच्या पौत्रप्रपौत्रांना देखील करितों इतका मी क्रोधपूर्ण व मत्सरी आहे यास्तव तुम्ही मूर्तिपूजा करून माझा द्वेष संपादूं नका' ह्या जेहोवाच्या (जेहोवा=यहुदी व ख्रिस्ती शास्त्रांतील परमेश्वर) उक्तीवरून दिसून येणारी ख्रिस्ती लोकांतील व यहुदी लोकांतील परमेश्वराची कल्पना, व नरसिंहावतारी प्रत्यक्ष वैऱ्याच्या मुलाला प्रिय भक्त मानून त्याचे वचन सत्य करण्याकरितां देव स्तंभांतून प्रकट झाला व कृष्णावतारी असंख्य खळांचा संहार करून देवाने त्यांजवर 'कृपा करून त्यांना 'भवी तारिलें' व अशा रीतीने आपला द्वेष करणाऱ्यावरही त्याने प्रीती केली ह्या वर्णनावरून प्रकट होणारी आर्यलोकांतील परमेश्वराची कल्पना, यांत सरस कोणती याचा विचार वाचकांनी करावा. ३. सद्गुणी. ४. परिवाना साध्वी. 'सुचरित्रा तु सती साध्वी पतिव्रता' इत्यमरः [सति अस्ति एकस्मिन पत्यो सा सती सती हा शब्द 'अस् भुवि' या धातूच्या शतृप्रत्ययान्त विशेषणास स्त्रीलिंगी ई प्रत्यय लागून झाला आहे. पतिव्रतेचे लक्षणः-'आन्र्ते मुदिते हृष्टा, प्रोषिते मलिना कृशा । मृते म्रीयेत या पत्यौ सा स्त्री ज्ञेया पतिव्रता' ॥ पतीला आनंद किंवा दुःख झाले असतां जीस अनुक्रमें आनंद किंवा दुःख होते, तो प्रवासाला गेला तर जी मलिन वस्त्र धारण करिते व त्याच्या वियोगाने का होते, व त्याच्या मृत्यूची वार्ता ऐकून जी आपला प्राणत्याग करिते तिला पतिव्रता ह्मणावेहा. अर्थ. ५. स्वरूपसंपन्न, लावण्यवती. पहिल्या दोन चरणांत भगवंताच्या सरी अनुवाद केला आहे. ९ मो० के०