या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० मोरोपंतकृत 36 तिलाहि बरवी म्हणा, उचित होय; तो करें ___N असेल संजली यथारुचि तयीं स्वयोषा करें । त्याच रीतीने ह्या तत्वज्ञानाचा अर्थ करून त्याप्रमाणे वागल्यास'-श्री. वि. प.) हा खऱ्या ईश्वरभक्तीचा केवळ विध्वंसक होय. काव्यरचनेच्या करामतीपुरताच विचार केला, तर याच्या तोडीचे काव्य महाराष्ट्रभाषेत दुसरे नाही. भक्तिपर स्तोत्र या दृष्टीने पाहिले, तर जुन्या धर्मातील मतें ज्यांस मान्य आहेत अशा वाचकांस त्यांत कांहीं गैर दिसत नाही; पण त्यांच्याहून वरच्या पायरीचे जे असतील,-म्हणजे ज्यांस ईश्वराविषयीं यथार्थ ज्ञान झाले असेल, त्यांस पूर्वोक्त दोषास्तव ते मान्य होण्याजोगें नाहीं' (निबंधमाला अंक ५४). अद्वैत तत्वज्ञानाचा मार्ग खऱ्या ईश्वरभक्तीचा विध्वंसक आहे काय?:-यासंबंधी कै० विष्णुबोवा ब्रह्मचारी यांच्या 'वेदोक्तधर्मप्रकाश' या उपयुक्त ग्रंथांतील पुढील मजकूर विचारणीय आहे. "नुसत्या तोंडाने अहं ब्रह्म (मीच ब्रह्म आहे.) म्हटल्याने व वाईट कर्मे करणे न सोडल्याने जीवाची सुटका होत नाहीं; कारण 'अहं ब्रह्म' हे वाचेचे बोलणे नाही. 'अहं ब्रह्म' भावना ही तुर्या अवस्था आहे, तीच ज्ञान्याला प्राप्त । झाली पाहिजे म्हणजे पापपुण्यांतून सुटका होईल. नुसत्या तोंडाने 'अहं ब्रह्म' बोलला, आणि तुर्या अवस्था पूर्ण प्राप्त झाली नाही, अथवा तशा वृत्तीची भावनाही नाही, तर सुटका नाही." 'अद्वैत' व 'द्वैतवाद्यांचा विरोध सध्याप्रमाणे तीव्र असण्याचे विशेष कारण नाही. 'अद्वैत'वादी जरी पूर्वी कधी काळी आह्मी परमेश्वराचेच अंश होतो किंवा पुढे कधी काळी तद्रूप होऊ असे मानतात तरी तेही 'द्वैत'वाद्याप्रमाणे आह्मी सांप्रत फार भ्रष्ट आहों असेंच समजतात. तेव्हां दोन्ही पक्षांनीही ईश्वराची भक्ति अनुतापवन्हीने शुद्ध होऊन, व त्याच्या व आपल्या मधील महदंतर ध्यानात ठेवून, प्रेमळ व एकनिष्ठपणेच केली पाहिजे. १. त्या भांडखोर जांबुवंताच्या कुरूप जांबुवती कन्येला. तिलाहि बरवी म्हणा. [असे म्हणणे] उचित होय, कारण तयीं स्वयोषा तोषाकरें करें यथारुचि सजली असेल, पदरजें जशी शिला; परिहे [कवितावधू] हरिमनोहराकृति सती [असे], धवे शापिली, अघे व्यापिली न असे-असा अन्वय. जांबवतीचें पाणिग्रहण केले तसे माझ्या कवितावधूचें पाणिग्रहण करण्यास प्रत्यवाय नसावा अशा प्रार्थनेचे दृष्टांताने समर्थन करीत कवि म्हणतात. २. चांगली होती असे म्हटले, वाईट कुरूप असतां रूपवती अस म्हणाला. ३. हे म्हणणे आपणास योग्यच आहे. वाईटाचा अंगीकार करून त्यास चांगले म्हणणे हे थोरांस योग्य आहे या न्यायाने तुम्ही तिला चांगली अस म्हटल हे ठीकच झाले. ४. तोष+आकरें आनंद+खाणीने, खनीने आनंदाची खाण अशा तुवां, सुखखनि अशा तुवां. [आकर खाण. “खनिः स्त्रियामाकरः स्यात्' इत्यमर; आकीयन्त धातवोऽत्र आकरः] ५. सजविली. [येथें सजणे हा धातु सकर्मक समजावा.] रूपवती केली असेल, जी कुरूप होती ती सुरूप केली असेल. ६. आपल्या आवडीप्रमाणे. अथारुचि' हे येथे क्रियाविशेषण अव्यय जाणावें. रुचिमनतिक्रम्य यथारुचि हा अव्ययी होय. यथामति, यथाशक्ति, यथावल ही अन्य उदाहरणे होत. 'यथा' याचे योग्यता, ण सादृश्य असे चार अर्थ आहेत. ७. आपण जांबवतीचें पाणिग्रहण केले क्रम, साकल्प आणि सादृश्य असे चार अर्थ आहेत.