________________
केकावलि. १०१ जशी पदरजें शिला; परि असे न है शापिली त्या समयीं. ८. आपली स्त्री जांबवती. योषा-स्त्री. [स्त्री योषिदबला योषा नारी सीमंतिनी वधूः' इत्यमरः. योषा याचे जोषा असें जवर्णघटित रूप आढळतें. योषति योषयति वा (सेवते) सा योषा.] ९. आपल्या हाताने. आपण आपल्या हस्तस्पर्शाने जांबवतीला मानवीरूप देऊन रूपवती केली असेल... १ वाईट पदार्थ चांगला करण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगी आहे याविषयी दाखला देऊन कवि म्हणतातः-जशी पदरजें शिला [रूपवती स्त्री केली]. पदरजाच्या योगाने जी शिला (धोंड, दगड) होती ती सुंदरी केली. कथासंदर्भ:-भगवान् विश्वामित्र ऋषियज्ञसमाप्तीनंतर श्रीरामचंद्र व लक्ष्मण यांना बरोबर घेऊन जनककन्या सीता हिच्या स्वयंवरार्थ जनकानें बोलावल्यावरून मिथिलापुरीस जाण्यास निघाले. वाटेत त्यांना एक निर्जन अरण्य लागले. तेथेच गौतमभार्या अहल्या पतिशापाने शिला होऊन पडली होती. विश्वामित्राने तिचा शापवृत्तांत रामाला कळवून तिचे शिलात्व भंग करून तिला पूर्वीचे स्त्रीरूप प्राप्त करून देण्यास सांगितले. त्यावरून श्रीरामचंद्रांनीं शिलेला पदस्पर्श केला. त्याबरोबर अहल्येचा शाप नाहीसा होऊन तिला पूर्वीचे सुंदररूप प्राप्त झाले. अहल्येच्या शापाचे कारण:-अहल्या ही ब्रह्मदेवाची कन्या अतिशय रूपवती होती. इंद्र व गौतम ऋषि तिच्याशी आपला विवाह व्हावा म्हणून इच्छा करित होते. त्यांत गौतम ऋषीला तिची प्राप्ति झाली. तेव्हां इंद्राला क्रोध येऊन तो पुष्कळ दिवस तिचे पातिव्रत्य भंग करण्यास टपून बसला होता. एकदां गौतम ऋषि स्नानार्थ बाहेर गेला असता त्याचे रूप घेऊन इंद्र अहल्येकडे गेला व तिला फसवून त्याने तिच्याशी समागम केला. समागमानंतर इंद्र स्वर्गास निघून जाणार इतक्यांत स्नान करून गौतम ऋषि तेथे आला व त्याने तपोबलाने इंद्राचे कपट ओळखले व त्याला 'तूं सहस्र भगांकित को भर शाप दिला. तसाच त्याने अहल्येस तूं एकहजार वर्षे शिला होऊन निर्जन अरण्यांत राहा शाप दिला व रामावतारी विष्णु तुझा पदस्पर्शाने उद्धार करील असा उ:शापही जिला पुढची अहल्येच्या उद्धाराची कथा वर सांगितलीच आहे. अहल्योद्धारकथेवरून सकार विचार:-या कथेवरून कित्येक विचार सुचतात. ऋग्वेदांत रहूगणाचा पुत्र गोतम नांवाच्या एका ऋषीची एकवीस सूक्ते आहेत. त्यावरून तो 'आधुनिक मनुष्याप्रमाणेच दीन, अल्पशक्ति, मर्त्य, अल्पज्ञानी, निर्धन, धनेच्छु, देवाविषयी अतिशयेंकरून भक्तिपरायण आणि दृढनिश्चयी असा होता' असे दिसते. (वेदार्थयत्न अंक २० पृ० ३५१) गौतमाच्या सूक्तांत पुष्कळ सूक्तांची देवता (उदाहरणार्थ, ऋग्वेदमंडल १ सूक्ते ८०-८४) इंद्र आहे. गौतमाच्या सूक्तांत इंद्राची स्तुति केली तिचा थोडासा मासला येथे दिला आहे. 'इंद्रानें पृथिवीवरील सर्व अवकाश. (आणि अंतरिक्ष (ही) भरून टाकिली आहेत. त्याणे द्यु लोकांत तेजस्वी नक्षत्रे जडली आहेत. हे इंटा। तुझ्यासमान कोणीही नाहीं, (पूर्वी) झालेला नाही, (आणि) पुढे होणार नाही. (तूं) विश्वापेक्षा मोठा आहेस'. (मंडल १ सूक्त ८१ मंत्र ५) 'सर्वज्ञानी (जे) वरुण (आणि) मित्र (ते) आणि इतर देवांसहित अर्यमा (हा) सरळ नीतीचा आम्हांला मागे दाखवो' (मंडल १ सूक्त ९० मंत्री भक्ति आणि उपासना जे जे लोक करितात त्यांस तो सन्मार्गाकडे वळवो' (मंडल १ सक्त ,