या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत ध, हरिमनोहराकृति सती अंघे व्यापिली. ॥ 37 मैले स्मरण जाहलें समाय, कसदासी करें साहाय केलें' असें ऋग्वेदांत वर्णन आहे. वास्तविक पाहतां वेदांत निरनिराळे देव एकाच प्रभूच्या भिन्न शक्ति ह्मणून त्यांचे स्तवन केले आहे असें चाणक्ष वैदिक वाचकांस दिसून येईल. पुराणांतील ही व इतर रूपके सोडवून त्यांचे सामान्य लोकांस ज्ञान करून देण्याचा व वैदिक व पौराणिक वर्णनांचा मेळ घालण्याचा प्रयत्न एखाद्या अर्वाचीन वैदिक पंडिताने केल्यास त्याचे लोकांवर मोठे उपकार होतील. या कथेस अनुलक्षून पंतांनी 'अहल्योद्धार' नामक स्वतंत्र दोन रमणीय लघुकाव्ये रचिलीं आहेत. (मोरोपंताची स्फुटकाव्ये भाग २ पहा.) २. परंतु. कवितावधू आणि अहल्या यांत जो विशेष भेद आहे तो कवियेथे दर्शवितात. ३. ही (कवितावधू) सती (साध्वी) [आणि] हरिमनोहराकृति (हरि+मन+हर+आकृति विष्णु+मन+हरणारी+आकार= विष्णूचें मन वश करणारी अशी आकृति जिची आहे) तसेंच अहल्या हरिमनोहराकृति (हरीचें-इंदाचें मन हरणारी आकृति जिची अशी) होती पण ती सती (साध्वी) नव्हती कारण ती परपुरुषभुक्ता होती. शिलेच्या अंगी जो एक दोष होता तो माझ्या कवितावधूच्या अंगीं नाहीं असें दर्शवीत होत्साते कवि म्हणतात. ४. शाप पावलेली, माझी कन्या साध्वी असल्यामुळे शापग्रस्त नाही. अहल्या इंद्राने उपभुक्त म्हणूनशापदग्ध आहे. १. पतीने, अर्थसंदर्भानें गौतममुनीने. [धव-पति. 'धवः पुमान्नरे धूर्ते पत्यौ वृक्षान्तरेऽ पि च' इति मेदिनी.] २. हरिला (इंद्राला, किंवा विष्णूला) मनोहर (मोहक) [आहे] आकृति (स्वरूप) [जीची ती (अहल्या किंवा कवितावधू). हरि शब्द श्लिष्ट आहे. अहल्या व कवितावधू दोघीही 'हरिमनोहराकृति' (अहल्या-इंद्राचे मन हरण करणारी व कवितावधू विष्णूचे मन हरण करणारी) खऱ्या पण इंद्र व विष्णु ह्या दोन हरीत फारच मोठा फरकः-एक परस्त्रीस जारकर्मानें दूषित करणारा, व दुसरा पापमलाने दूषित होऊन शीलात्वदशा पावलेल्या दुर्दैवी स्त्रीस आपल्या पदरजानें भूषित करून पुण्यश्लोक अशा पंचकन्यामालिकेंत तीस मूर्धाभिषेक करणारा. या संबंधाने पंतांच्या 'अहल्योद्धार' काव्यांतील एक संस्कृत श्लोक वाचनीय समजून पुढे दिला आहे. अहल्या रामाला म्हणते-'त्वां हरिमेव वदामि जगत्पतिमार्यमनार्यमहं न तु शक्रं । त्रात इभो भवतैव सुरेष्वपि सत्सु निहत्य सरस्युरुनक्रं ।। का नु भवतमृर्जु गुरुमाद्यमपास्य भजेत्तमकारणवत्रं । प्राप्य पिबेदमृतं रसवित् खलु न त्वपहाय तदण्वपि तक्र' ॥ (अहल्योद्धार ३९). ३. पापाने. माझी कवितावधू पापाने व्यापिलेली अशी नाही. ज्यापेक्षां कवितावधू धवें शापिली, अघं व्यापिली, अशी नाही, त्यापेक्षां तिला नीट साजरी करावयास फारसें जड पडावयाचें नाहीं-असा भावार्थ. उत्तरार्धात उपमा अलंकार असून व्यतिरेकाची स्पष्ट छाया पडली आहे. ४. समयिं भलें स्मरण जाहलें; समुज्वलदयासुधासीकरें [तुम्ही] करें कंसदासी कशी उजरली? स्वरिपुची तशी ब तुम्ही आवडे [आणि] मत्कृती नको, न सजवे. [अहो देवा!] असा बहुत दु" [आहे] काय?-असा अन्वय. या केकेंत पूर्वोक्त अर्थाचे समर्थन उदाहरणाने