या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. कशी उजरली समुज्ज्वलदयासुधासीकरें ? । तुम्हा स्वरिपुची तशी बॅटिक आवडे, मत्कृती करीत होत्साते कवि भगवंतास प्रार्थितात. भलेचांगले ५. योग्य समयावर चांगले स्मरण झाले. येथे स्मरण कशाचें झालें तें कवि सांगतात. ६. योग्य प्रसंगी, उचित समयीं. समयीं म्हणजे उचितसमयीं असा अर्थ येथे विवक्षित आहे. इंग्रजीतही In time ह्याचा अर्थ 'योग्य वेळी' असाच होतो. ७. कंसाची दासी; अर्थसंदर्भानें सुप्रसिद्ध कब्जा. कथासंदर्भ:-त्रेतायुगांतील कैकयीची दासी मंथरा शापाने द्वापारयुगांत कंसदासी कुब्जा झाली. हिचें असें नांव पडण्याचे कारण ही तीन ठिकाणी शरीराने वक्र होती. कृष्ण आणि बलराम यांस धनुर्यागार्थ कंसाने मथुरेस आणविले तेव्हां हिनें कृष्णाला अंगराग देऊन संतुष्ट केले. पुढे ही कृष्णप्रसादाने सरळ व रूपवती झाली. यासंबंधाने 'मंत्रभागवतां' तील पुढील गीति फार वाचनीय आहेत:-'यप्रथमबंधु जीचा देह अशी भेटली पथीं रामाः। ते प्रेमें अनुले। पन देउनि दे तोष माधवा रामा. ॥ १०. ५१७ नरलोकी सुरलोकीं अतुळ करि तिच्या त्रिवक्र देहाते. । तक्रोचिताहि दीना सकृप सुधाकर न तक दे हातें. ॥ ५१८ मोडुनि, पुत्रं घडली, रुचिर रची दृष्टिनेंचि, त्या तनुला । जाणों श्रीपद लावी शुद्ध्यर्थचि, करहि सांत्वना हनुला. ॥ ५१९ कंसवध केल्यानंतर भगवान् कृष्ण हिच्या निःसीम प्रेमास्तव हिच्या ठिकाणी रत झाले. यास्तव गोपी कुब्जेचा फार राग करित. गोपी परस्पर बोलतातः-'प्रियसखि ! लाजे जिव्हा, ज्याची पदधूलि सुर सदा सीसीं। वाहत होते, त्यांसीं त्या मथुरेमाजि सुरत दासीसी.॥ ४ ॥ या भाग्यावरुनि गमे, बहुतचि जन्मांतरीं करी सव ती । सवतीस दैव फळलें, हा व्रजसर्वस्व भोगिती सवती ॥ १० ॥ टाणे टोणे शिकतों, तरि सखि देतोंचि तीस उडवून । सखि! कोणालाहि किमपि सुख चिर न मिळेचि सुकृत बुडवून ॥२१॥ कुब्जा राणी हरिला, बहु कुब्जेलाहि आवडेल हरी । लहरीस सिंधु संतत, सिंधुसहि सदैव आवडे लहरी ॥' ३६ (गोपीगोडवा'-मोरोपंतकत). - पंतांचे 'गोपीगोडवा' हे लहानसें काव्य फार सरस आहे. रसिकांनी त्यांतील गोडी अवश्य चालली १. सरळ केली, कुरूप होती ती सुरूप केली, वक्र होती ती सरळ केली. ज. रणे=उजू करणे सरळ करणे. 'मी भक्तिवश न चुकलों त्या कुब्जेच्याहि वपुसि उजगया (मोरोपंत-शांतिपर्व), [कृष्णविजय-पूर्वार्ध-अ० ४२ पद्य ३, अ० ४८ पद्य २, हरिगाह ४९ गी० १३०, या पद्यांत उजरी या क्रियापदाचा उपयोग पंतांनी र २. समज्ज्वल+दया+सुधा+सीकरें अतिस्वच्छ, सुनिर्मल+करुणा+अमृत+बारीक वर्षावाने, लघु वृष्टीने, अतिनिर्मळ करुणामृताचे कण ज्यापासून उद्भवतात अशा तुवां, अतिस्वच्छ दयासुधेचा सीकर आहे ज्यापासून अशा (देवानें-तुवां). 'समुज्ज्वलदयासुधासीकरें' हे सामासिक पद 'करें' याचे विशेषण केले तरी चालेल सीकर पाण्याचे कण. 'शीकरोऽम्बुकणाः स्मृताः' इत्यमरः. सीकर अथवा शीकर असा दंत्यतालव्य शब्द आहे. 'शीकरं सरले वातसृतांबुकणयोः पुमान्.] ३. तुम्हा (तम्हाला स्वरिपुची (आपल्या शत्रूची-अर्थसंदर्भाने कसाची) तशी (तशा प्रकारची, आठ ठिकाणीं वांकडी अशी, वेडीविद्गी अशी) बटिक (दासी, कसदासी कुब्जा) आवडे