या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत कथा अशि असो, पहा स्वचरितें तुम्ही मेजुनी. ॥ ३९ प्रभो! शरण आलियावरि न व्हां कधी वांकडे निर्णयसागरांतील रामायणाची आवृत्ति.] ६. दांतांनी चावलेली आणि नाकानें हुंगलेली अशी. ७. बोरें. संस्कृत 'बदर' शब्दास 'बोर' असा आदेश होतो. ८. देती झाली. ९. प्राचीन, रामावताराची ही जुनी कथा आहे. 'जुनी' असाही पाठ आढळतो. तेथे जुनी-जीर्ण (फळे) असा अर्थ घेतला पाहिजे. अर्थसादृश्यः-या केकेशी, तसेच मागील सातव्या केकेशी पुढील तुकारामाचा अभंग अत्यंत समानार्थक आहे:-भाविकांचे काज अंगें देव करी । काढी धर्माधरी उच्छिष्ट तें ॥ १ ॥ उच्छिष्ट ती फळे खाय भिलटीची । आवडी तयांची मोठी देवा ॥ २ ॥ काय देवा घरी न मिळेचि अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥ ३ ॥ अर्जुनाची घोडी धुतली अनंतें । संकटें बहूते निवारिली ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसी आवडती लडिवाळें । जाणीवेचे काळे तोंड देवा ॥ ५ ॥ या केकेंत सांगितल्याप्रमाणे प्रभूच्या भक्तवत्सलतेच्या अशा कथा पुराणेतिहासग्रंथांत अनंत आहेत. १. ही जी म्यां उदाहरणार्थ एक कथा सांगितली ती असो (एकीकडे राहो, ती राहूं घा). २. अशा कथा पुष्कळच आहेत, यास्तव तुमची चरित्रे तुम्हीच मोजून पहा, आपल्या मागील चरित्रांची आठवण करून पहा. बोरांपेक्षां तर माझी कवितावधू वाईट नाहींना? असा सांगण्याचा भाव. तेतिसावे केकेपासून या केकेपर्यंत आपण यथामति केलेल्या स्तुतीचा स्वीकार करावा अशा आशयाने प्रभूची प्रार्थना केली आहे. या केकेच्या पूर्वार्धात हेतु अलंकार आहे. [मागें केका ३२ पृ० ९० पहा.] ३. प्रभो! शरण आलियावरि [तुम्ही] कधीं वांकडे न व्हां [असे आहे] म्हणोनि जीवांकडे स्वहितकृत्य हे (शरण येणे) इतुकेंचि [आहे]. प्रसाद करितां पळ विलंब नसे [हें ही बापा! खरें [आहे], पांखरें [मुख] उघडिल्याविना मुखीं घनांबु न पडे-असा अन्वय. शरणागतावर प्रभूचा प्रेमा फार असतो आणि त्याजवर अनुग्रह करण्यास प्रभु सदा तत्पर आणि उत्सुक असतो-अशा अभिप्रायाने कवि म्हणतात. ४. जो कोणी तुम्हाला अनन्यभावाने शरण आला त्याविषयी तुम्ही कधी वांकडे होत नाही. जो कोणी शरण आला त्याचा अंगीकार करण्यास प्रतिकूल होत नाही. प्रभु आणि शरणागतःभगवान् शरणागताची उपेक्षा कधीही करीत नाही असे तुकोबानें वर्णिले आहे. 'निष्ठावंत भाव अक्तांचा स्वधर्म । निर्धार हे वर्म चुकों नये ॥ निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांचा ॥ तुका म्हणे ऐसा कोणे उपेक्षिला । नाहीं आयकिला ऐसा कोणीं ॥ [तुकारामअभंग ९००]. आमच्या प्राकृत कवींचे ईश्वरविषयक प्रेमळ उद्गार पाश्चात्य उदार विचारांशी किती तरी जुळतात! निष्ठावंत भावाबद्दल ख्रिस्ती शास्त्रांतील पुढील वाक्ये पहा:- I will love Thee, O Lord, my strength. The Lord is my rock, and my fortress, and my delicerer; my God, my strength, in whom I will trust; my buckler, and n of my salvation, and my high tower (Ps. XVIII). U अत्यत क्षमाशीलत्व, शरणागतांचा अंगीकार करण्याचे त्याचे ब्रीद, व त्याची अपार दया, ह्या gére tetica