या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ मोरोपंतकृत नसेचि शरणागती घडलि सत्य अद्यापि ती; रुचे विषय; ज्यां मिळे अमृत, ते न मद्या पिती. ॥ ४१ God belong mercies and forgiveness, though we have rebelled against him.' ( Dan IX.9 ) ७. पालनपोषण, उद्धार. भक्ताचे पालन करणे हे प्रभूचे ब्रीद आहे. पंत म्हणतातः-'प्रभु भक्तातें जपतो, तैसा न निजाहि फार देहातें.' [नरसिंहमहतास्तव ८ ]. १. शरण+आगती=शरण येण्याची क्रिया. शरण रक्षणकर्ता, रक्षण करण्याला समर्थ. आगति-येणे. रक्षण करण्याला जो समर्थ त्याजकडे 'माझें रक्षण कर' म्हणून नम्रपणाने येणे. जे परमेश्वरास अनन्यभावें शरण येतात त्यांस ईश्वरी दयेचा लाभ सहज होतो. [गीता-अ० ९ श्लो० २३.] ख्रिस्ती शास्त्रांतील पुढील वचनाशी ही केका ताडून पहावी:- The sacrifices of God are a broleen spirrit: a Urroleen and. Contrite heart, O God! thou wilt not despise.' (Ps 51-17.) 370i7i संतांची अनेक वचने आहेत. स्थलसंकोचास्तव ती येथे दिली नाहीत. शरण येण्याची क्रिया माझ्या हातून जशी व्हावयास पाहिजे तशी ही वेळपर्यंत घडली नाहीं हे खरे आहे. भगवन्नामास उद्देशून पंतांनी म्हटले आहे:-'जे शरणागत घालिति बा नामा! त्वत्पदी मिठी प्राज्य । कल्पशतीही न सरे ऐसें देसी तयांस साम्राज्य. ॥ २४ ॥' [नाममाहात्म्य-पृ० ३४८.] तसेंच 'नामरसायन' गी० ७६-७८ पहा. जे वास्तविक शरणागत आहेत त्यांचा उद्धार प्रभुकृपेने होतोच होतो असे सांगण्याचे तात्पर्य आहे. २. स्त्रीपुत्रधनादि विषय. अजून मी तुला खरोखरी शरणच आलों नाही. याला प्रमाण मला मद्याप्रमाणे मोहक असे स्त्रीपुत्रधनादि प्रापंचिक विषय आवडतात. जो परमेश्वराला अनन्यभावें शरण गेला त्याला विषयसुखाचा वीट येऊन संसार असार भासावयास लागतो, तसा प्रकार माझा नाहीं. ३. ज्या मनुष्याला. ४. सुधा किंवा मोक्ष. ज्यांला अमृत प्यावयास मिळते ते मद्याकडे ढुंकून सुद्धां पहात नाहीत. येथे अर्थांतरन्यास नामक अलंकार झाला आहे. [मागें केका २ टीपा, पृ० ८, टीप २ पहा.] याची निवडक उदाहरणे:-(१) समयी विक्रम करणे याहुनि पुरुषा नसे पराभूषा (हरि० ४८-१०८). (२) स्त्री श्रमरहिता भोगें देह बहु करुनि न पुष्ट माजावी (हरि० ४४.४७), (३) कालाची गति उग्रा कोणाहि भविष्य वा परतवेना (हरि० ४४-२७), (४) जें समयाचे भेदक अपवित्र जगांत तें शवापरिस (हरि० ४३.१०), (५) अर्क प्रिय नलिनीस, स्त्रीस रुचिर, शूरमतिस तो कर्क (हरि० ४२-२५), (६) स्त्रीधर्षणे बुडे यश, मानी वपुस न, जपो कलत्रास (हरि० ३७. ४५), (७) जो सुप्रजा न, वंध्यचि तो पुरुष; न पुत्र मूर्त अघव्याला (शल्य २.११२). ज्यांस अमृत (सुधा) मिळते ते लोक मद्य (आसव) पीत नाहींत ही सामान्योक्ति. हिचे समर्थन-अद्यापि मला प्रसादलाभ झाला नाही म्हणून विषय रुचतो, प्रसादलाभ होता तर विषय न रुचता-अशा विशेषोक्तीने केले म्हणून अर्थांतरन्यास. मारपती सुभाषितेंः-पंतांच्या काव्यांत या अलंकाराची उदाहरणे ही आकाशांतील तारकासमु वहूंकडे मुबलक सांपडतात, व त्यामुळे पंतांची कवितावधू नक्षत्रांप्रमाणे शोभायमान