या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत शांत रसाला अनुकूल नाही. पंतांस आपल्या काव्यांतून लांब लांब समास व लांब लांब संस्कृत वाक्ये घालण्याची फार हौस होती असे त्यांचे काव्य वरवर वाचणारांस सुद्धा दिसून येईल. लांब संस्कृत वाक्यांची थोडी उदाहरणे:-(१) 'संश्रितजनकल्पतरोर्जयतितरां यदुशिरोमणेः कृपया' कर्ण० ५०-६८), (२) 'भगवन् सांब नमस्ते शर्व नमस्ते महेश्वर नमस्ते । त्वं प्रभुरसि शिव जगति त्रातुं शरणागतानिह समस्ते' (हरिवंश ५०-३८), (३) 'प्राज्ञस्तोपं जनयेत् तदेव शिवपूजनं' अशा उक्ति (कर्ण० ४१-८२), (४) 'काचस्मृतिरपि तापसि! मैवं प्रलपात्र भूभुजः सदसि' (आदि० १२-६३), (५) परिसुनिधर्म वदे 'अयि सति कुंति मतं ददामि किं ते' तें (आदि० १८-६४), (६) 'ब्रूयात्क्षमी गभीरोऽसीति बत युधिष्ठिरं प्रभुं को न' (सभा० अ० ४ गी० ८५), (७) 'इदमपि धनं जितं ते' शकुनि म्हणे दीप्तपावक पटानें (सभा० ४-५५), (८) भीष्म प्रसन्न चित्तें 'वार्ष्णेय ! स्वागतं तव' असेंच (भीष्म० ११-२५) याची आणखी ठळक उदाहरणे पुरवणींत पहावी. यामुळे त्यांच्या काव्यास संस्कृत काव्याप्रमाणे प्रौढता आली आहे. आपल्या काव्यांत संस्कृत शब्द, पदें व समास यांचा फार भरणा असल्यामुळे ते उलगडावयास लोकांस प्रयास पडतील व कदाचित् त्यांना ते आवडणारही नाही असा पंतांना धाक वाटला असावा असे पुढील मंत्ररामायणांतील गीतींवरून दिसून येईल. 'गीवार्ण शब्द पुष्कळ, जनपदभाषाचि देखतां थोडी, । यास्तव गुणज्ञ लोकी याची घ्यावी हळू हळू गोडी. ॥ १७ ॥ प्राकृतसंस्कृतमिश्रित, यास्तव कोणी म्हणेल जरि कंथा। भवशीतभीतिभीत स्वांताला दाविला बरा पंथा ॥ १८ ॥' [रामायणे भाग १-मंत्ररामायण-उपोद्घात-पृ० ४०] (हे) भगवन् ! [हे देवा!] अजामिलसखः (शूद्राप्रमाणे आचरण करणाऱ्या अजामिळ नांवाच्या ब्राह्मणाचा मी सखा-मित्र अजामिळासारखा महापापी) अस्मि (आहे) क्षमस्व (म्हणून माझ्या अपराधांची क्षमा कर). देवा! शूद्रस्त्रीशी रममाण होणाऱ्या अजामिळ नामक ब्राह्मणाधमाप्रमाणे मीही पापनिमग्न झालो आहे; तेव्हां जशी तुम्ही अजामिळावर कृपादृष्टि करून त्याचा उद्धार केलात त्याचप्रमाणे माझ्या अपराधाची मला क्षमा करून माझाही उद्धार करा-हा भावार्थ. पंतांनी आपल्यास 'अजामिळसख' ह्मटले आहे ही त्यांची केवळ विनयोक्ति समजावी. तुकोबांनी व इतर भगवद्भक्तांनी आपल्याविषयी असेच उद्गार काढिले आहेत. पंतांच्या चरित्रावरून व त्यांच्या पुष्कळ प्रेमळ उक्तींवरून ते फार सदाचारसंपन्न असावे असे दिसते. त्यांची ‘सन्मनोरथराजि' सारखी लघुकाव्ये याची चांगली साक्ष देतात. उदाहरणार्थ 'सन्मनोरथराजि' तील एकच अर्धे पहा:-'मज अन्यकलत्राचे स्पर्श न विटवू जसें चहाडाचें ॥' कथासंदर्भ:केका २ पृ० ७ यांत 'अजामिळ' कोण हे सांगितले आहे. ५. मित्र. 'सखा' शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे:-'अत्यागसहनो बंधुः सदैवानुमतः सुहृत् । एकक्रिय भवेन्मित्रं समप्राणः सखा स्मृतः ॥.' पुष्कळ अपराध केले तरी जो ते सहन करितो त्याला 'बंधु' म्हणावें, नेहमी ज्याचे आपले मत एक असते त्याला 'सुहृत्' म्हणावें, जे एकाच वेळी सारखाच उद्योग करितात त्यांला मित्र म्हणतात, व ज्याचा आपला एक जीव त्याला सखा ति. मूळ संस्कृत शब्द 'सखि' असून अजामिळ शब्दापुढे येऊन येथे तत्पुरुष समास न राजाहःसखिभ्यष्टच्' या सूत्रान्वयें 'अजामिळसखः' असा सामासिक शब्द झाला. 'अथ मित्रं सखा सुहृत्' इत्यमरः.